बुकिंग क्लार्क व्यवस्थापक, डोअर कीपर यांना नाट्य मंदीरातर्फे १२५ जणांना मदतीचा हात

मुंबई (शांत्ताराम गुडेकर) : जगभरात आज कोरोनाव्हायरस ने थैमान घातले आहे. या कोरोना व्हायरसच्या अभूतपूर्व संकटाचा सामना सगळं जग करत आहे, आणि याचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने जे जे शक्य होईल ते ते करत आहे. मुंबईतील नाटयमंदार ही गेली ५५ वर्षं नाट्यसृष्टीत अविरतपणे व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारी संस्था आहे. या संस्थेच्या अनेक नाटकांनी रंगभूमीवर इतिहास घडवला आहे, सध्या वैशाली कॉटेज, कधी घरी कधी शेजारी, खळी, मुलगी वयात येताना' इत्यादी नाटकं रंगभूमीवर रुंजी घालत आहेत.अशा नाट्यसंस्थेचे निर्माते स्वर्गीय राजाराम शिंदे यांनी सुरू केलेला हा नाटय प्रवास त्यांचे चिरंजीव अभिनेते मंदार शिंदे यशस्वीपणे चालवत आहेत.सध्या कोरोनामुळे संकटात  सापडलेल्या बुकिंग क्लार्क,व्यवस्थापक,डोअर कीपर यांना अन्न धान्य वाटप करून माणुसकीचा धडा दिला आहे.यावेळी बुकिंग क्लार्क आणि व्यवस्थापक संघ सचिव हरी पाटणकर,खजिनदार नितीन नाईक,विजय सुरयवंशी जितू पाटील उपस्थित  होते.ही मदत व्यवस्थापक टीम शिवम पाटणकर, बाबू राणे, परवीन दळवी , एस.भारती यांनी शिवाजी मंदिर, दामोदर हॉल,बोरिवली ,ठाणे, कल्याण येते नाट्यगृहात देण्यात आले.अध्यक्ष  गोट्या सावंत,सचिव हरी पाटणकर,खजिनदार नितीन नाईक,सदस्य-विजय सुर्यवंशी,जितूपाटील,मंदार राजाराम शिंदे,शिवम पाटणकर आदींची उपस्थिती होती.बुकिंग क्लार्क,व्यस्थापक,डोअर किपर यांच्यावतीने नाट्य मंदारचे  मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.



संबंधित पोस्ट