कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारला पुढे यावे लागेल : देवेंद्र फडणवीस
संकट काळात भाजप कार्यकर्ता जनतेच्या सेवेत : स्मृती इराणी
- by Adarsh Maharashtra
- Jun 28, 2020
- 1862 views
काँग्रेस कल्चर शिल्लक असे पर्यंत भाजप कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही
भाजपाची ऐतिहासिक व्हर्च्युअल रॅली
एक कोटी नागरिकांचा सहभाग
स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, मंगलप्रभात लोढा, पूनम महाजन, विनोद तावडे, नितेश राणे यांचा सहभाग
समाजाच्या प्रत्येक संकटकाळात भाजपा कार्यकर्ता जनतेच्या खांद्याला खांदा लावून उभा असतो, त्याचा आपल्याला अभिमान आहे, असे उद्गार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज काढले. भाजपाने आज स्मृती इराणी यांची मुंबई आणि कोकणासाठी व्हर्च्युअल रॅली आयोजित केली होती. त्यात त्या नवी दिल्लीहून सहभागी झाल्या होत्या. काँग्रेस संकटकाळात नेहमी देशविरोधी वागत आली आहे याची उदाहरणे देत त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. तर समाज अडचणीत दिसला कि भाजप कार्यकर्ता मदतीला धावतो असे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील भाजप कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना स्मृती इराणी यांनी सांगितले की केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारला जनतेने भरभरून पाठींबा दिल्याने गेली अनेक वर्षे जे मुद्दे भाजप ने राजकारणात मांडले ते पूर्ण करता आले. जनतेच्या जोरदार पाठिंब्यामुळेच कलाम ३७० रद्द करता आले आहे. जनधन खाती उघडल्याने लोकांना थेट मदत मिळते आहे त्यामुळे भ्रष्टाचार खूप कमी झाला आहे, असेही त्या म्हणाल्या. जनतेच्या पाठिंब्यामुळेच काश्मीरसह राममंदिराचा ही प्रश्न मार्गी लागला आहे, असे त्या म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासाठी लॉकडाऊन घोषित करतानाच गरीब कल्याण योजना जाहीर केली असे सांगून त्या म्हणाल्या कि ८० कोटी नागरिकांना अन्नधान्य पोहोचवण्यात आले. त्याचबरोबर जीडीपी च्या दहा टक्के इतक्या रकमेचे आत्मनिर्भर पॅकेज मोदी सरकारने घोषित केले आहे. काँग्रेसच्या संकुचित मानसिकतेत या योजनांचा विचारही सुचला नसता असे त्या म्हणाल्या. लॉकडाऊन पर्यंत भारतात एकही पीपीई किट बनत नव्हते, हि सत्तर वर्षातील भारताची हालत होती. मात्र मोदींच्या नेतृत्वात आज भारत पीपीई कीटचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक बनला आहे, असे स्मृती इराणी म्हणाल्या. आत्मनिर्भर भारताचे आवाहन करताना हे अगदी चपखल उदाहरण आहे असे त्या म्हणाल्या.
यावेळी बोलताना स्मृती इराणी यांनी राज्य सरकारच्या कृतिंवरही आसूड ओढले. आघाडीचे काँग्रेसीकरण झाले आहे, त्यामुळे कोरोनाच्या या संकटकालातही भ्रष्टाचार वाढत आहे असे त्या म्हणाल्या. सरकारच्या विरोधी लिहिणाऱ्या, सरकारच्या चुका दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, असे सांगून स्मृतीजी म्हणाल्या कि काँग्रेसची आणीबाणी ची मानसिकता आघाडीतल्या घटक पक्षातही मुरत आहे. ज्यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या या मानसिकतेशी भाजपच्या साथीने लढा दिला तेच काँग्रेसच्या आघाडीत सामील होणे हा जनतेचा विश्वासघात आहे आणि त्याची देशभर चर्चा आहे असेही त्या म्हणाल्या.
ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात छत्रपतीं शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या जिजाऊ माता होत्या, त्या महाराष्ट्रात आज देशविरोधी शक्तींची साथ देणार्यांचे सरकार सत्तेत आहे, अशी घणाघाती टीका स्मृती इराणी यांनी केली. आज राजीव गांधी फाउंडेशनचे सत्य जनतेला हादरवून गेले आहे असे त्या म्हणाल्या. काँग्रेसीकरणामुळेच पालघरमध्ये साधूंची हत्या होते, काँग्रेसीकरणामुळेच कोरोना मृतांच्या बॉडीबागमध्येही घोटाळा होतो असेही त्या म्हणाल्या.
या काळात पीडित जनतेची मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्षाला अभिमान आहे असेही स्मृती इराणी म्हणाल्या.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले कि काँग्रेस काळात सरकारने वरून पाठवलेलया शंभर रुपयातले फक्त दहा पैसे तळातल्या लोकांपर्यंत पोहोचायचे, तर मोदीजींनी जनतेच्या थेट बँक खात्यात मदत द्यायला सुरुवात केली आहे. लघु उद्योगांना दिलेल्या थेट मदतीमुळे अनेक लघु उद्योग पुन्हा उभे राहत आहेत असे ते म्हणाले.
अनेक राजकीय पक्षांच्या कथनि आणि करणीत प्रचंड फरक असतो. मात्र आम्ही जे सांगत होतो ते संसदेत बाळ मिळाल्याबरोबर आम्ही करून दाखवले आहे असे ते म्हणाले. आम्ही ३७० कलम रद्द केले आहे, मुस्लिम महिलांसाठी ट्रिपल तलाक रद्द केला आहे असे त्यांनी सांगितले.
राज्यातील सरकारच्या कोरोना संकट हाताळण्यात आलेल्या अपयशावर फडणवीस यांनी टीका केली. राज्य सरकार आकडे लपविण्याचा लढाई लढत आहे, त्यातून मृत्यू दार वाढतो आहे, असे ते म्हणाले,. सुप्रीम कोर्टाने देखील राज्य सरकारला मजुरांच्या मदतीप्रश्नी फटकारले आहे. राज्य सरकारने कापूस खरेदी, मका खरेदी केली नाही. केंद्र कडून पूर्ण पैसे देऊ करुनही राज्यसरकार खरेदी करत नाही असे ते म्हणाले. कोरोना संकट नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारला पुढाकार घ्यावा लागेल असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले वर्ष नुकतेच पूर्ण झाले आहे. या ऐतिहासिक ठरलेल्या वर्षातील यशस्वी उपलब्धी जनतेसमोर मांडण्यासाठी भाजपाने व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन केले होते. रविवार दि. २८ जून २०२० रोजी सायंकाळी ६.३० वाजता झालेल्या या रॅलीत तीस लाखाहून अधिक लोक सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी आणि राज्यातील विरोधी पक्ष नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख भाषणे यावेळी झाली.
या रॅलीमध्ये मुंबई अध्यक्ष श्री.मंगलप्रभात लोढा, रॅलीचे संयोजक खासदार श्री.मनोज कोटक, खासदार पूनम महाजन, खासदार गोपाळ शेट्टी, माजी मंत्री विनोद तावडे, आमदार भाई गिरकर, आ.नितेश राणे, माजी मंत्री रिपब्लिकन पक्षाचे अविनाश महातेकर, मुंबई भाजप संघटनमंत्री सुनील कर्जतकर, मुंबई महामंत्री अमरजित मिश्रा, नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवाडकर हे मुंबई भाजप कार्यालय वसंत स्मृती येथून या व्हर्च्युअल रॅलीत सहभागी झाले. प्रदेश अध्यक्ष श्री.चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूर येथून तर प्रदेश प्रभारी श्रीमती सरोज पांडे या नवी दिल्लीतुन व्हर्चुअल रॅलीत सहभागी झाल्या.रॅली प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रसाद लाड, माजी आमदार राजन तेली हेदेखील या व्हर्च्युअल रॅलीत विविध ठिकाणाहून सहभागी झाले होते.
नवी दिल्लीहून खा. विनय सहस्रबुद्धे यांनी या सभेचवे सूत्रसंचालन केले. देवेंद्र फडणवीस यांनी सभेच्या शेवटी आत्मनिर्भर भारताची शपथ दिली.
सदरची व्हर्च्युअल रॅली महाराष्ट्र भाजपच्या फेसबुक पेजवरून तसेच युट्युब वरूनही प्रसारित करण्यात आली.
युट्युब लिंक :
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम