आमदार गोपीचंद पडळकरांना महाराष्ट्राच्या विविध भागातून वाढता पाठिंबा.
- by Reporter
- Jun 27, 2020
- 1236 views
मुंबई (भारत कवितके) : आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या विरूध्द केलेल्या विधानावरून राज्यात राष्ट्रवादी कडून गोपीचंद पडळकरां विरूध्द अनेक भागातून तीव्र पडसाद उमटले .राष्ट्रवादी कडून गोपीचंद पडळकरांच्या पुतऴ्याचे व प्रतिमेचे दहन करण्यात आल्याच्या घटना घडल्या.व प्रतिमेला काळे फासून पडळकरां विरोधी घोषणा दिल्या.याला प्रतिउत्तर म्हणून नाशिक मध्ये धनगर समाज सेवा संघाच्या वतीने गोदावरीतील शुध्द जला ने व दुधाने तर पंढरपूर मधील बळीराजा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रभागेतील जला ने व दुधाने आमदार गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेस अभिषेक करून स्वच्छ केले.व गोपीचंद पडळकरांना पाठिंबा दर्शविणार्या घोषणा केल्या.एका बाजूला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकरांच्या तोंडाला काळे फासू.असे घोषित केले.तर गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी ' गोपीचंद पडळकरांच्या केसाला तरी धक्का लाऊन दाखवा.' अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे या प्रकरणातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.राज्यातील काही धनगर समाज संघटनेने या बाबत प्रतिक्रिया दिली की, ' आमदार गोपीचंद पडळकर काय बोलले हे त्यांचे वैयक्तीक मत असू शकते.पण धनगर समाजा बद्दल मात्र कुणी काही बोलल्यास खपवून घेतले जाणार नाही.
रिपोर्टर