संकल्प संस्थेकडून बेघर कुटुंबांना मदतीचा हात

मुंबई (शांत्ताराम गुडेकर) : गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरात   बुधवार दिनांक ३ जून २०२० रोजी पहाटे ४ वाजता भीषण आग लागली होती. या आगीत जवळपास ३० घरे पूर्ण जळून राख झाली होती. मोठया प्रमाणात लोकांचे नुकसान झाले आहे. त्यांच्याकडे काहीच राहिले नाही. सर्व काही आगीमध्ये गेले होते. या कुटूंबाना बेघर होण्याची वेळ आली आहे.या बेघर कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी शासकीय मदत फार अपुरी पडत असल्याने संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांच्या माध्यमातून त्यांनी संकल्प संस्थेचा मदतीचा हात पुढे केला आहे. संकल्प संस्था आणि मेष फाउंडेशन तसेच मनपसंत लाईफ यांच्या संयुक्तपणे या बेघर कुटुंबाचे पुन्हा संसार सुरळीत चालण्यासाठी सर्व प्रकारची भांडी आणि दरी, चादर, तोंडाला लावण्यासाठी मास देखील वाटप करण्यात आले आहेत. तसेच याआधी ही बेघर कुटूंबाना संकल्प संस्थेकडून रेशन किट आणि ताडपत्री वाटप करण्यात आले होते. त्याचबरोबर काही दिवसांकरिता अल्पोपहाराची व्यवस्था ही करण्यात आली होती. विशेष सहकार्य डॉ.प्रभा तिरमारे सहाय्यक प्राध्यापक कॉलेज ऑफ सोशल वर्क मुंबई विद्यापीठ, क्रिस्टीन कपाडिया जनसंपर्क अधिकारी कॉलेज ऑफ सोशल वर्क (स्वायत्त) निर्मला निकेतन कॉलेज मनपसंत लाईफ निमिषा वोराजी कांता रोकडे यांचे अमुल्य योगदान लाभले आहे. तसेच संकल्प संस्थेने स्वयंसेवक शाहिद शेख आणि नजमा खान याचे ही मनःपूर्वक आभार यावेळी मानले आहेत

संबंधित पोस्ट