मुलुंडमध्ये अद्यापही काही रुग्णालये कोरोना चाचणीसाठी आकारतात जादा दर

मुलुंड:(शेखर चंद्रकांत भोसले) कोरोनाच्या  चाचणीसाठी सरकारने नवे दर लागू केले असले तरी देखील मुलुंडमधील काही खाजगी लॅबकडून स्वब टेस्टसाठी जुन्याच पद्धतीने दर आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर येवू लागल्याने अश्या संस्थांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

कोरोनाच्या चाचणीसाठी सुरुवातीला ४५०० रूपये आकारले जात होते परंतु एवढी रक्कम देणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे असल्याने मुलुंडचे स्थानिक आमदार मिहीर कोटेचा यांनी ज्याप्रमाणे इतर राज्यात कोरोना चाचणीसाठी २२०० रूपये आकारले जातात त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील २२०० रूपये आकारले जावे अश्या आशयाचे ट्वीट केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारकडून या दरांत कपात होवून २२०० रूपये दर ठरविण्यात आला व तसे सर्व लॅबना कळविण्यात आले. असे असूनही काही लॅब २२०० रुपयांपेक्षा अधिक रक्कम आकारत असल्याचे आढळून आले आहे. 

मुलुंड मधील स्पंदन हॉस्पिटल व इतर काही खाजगी रुग्णालयात कोरोना चाचणीचे २८०० रूपये घेतले जात असल्याच्या तर काही ठिकाणी ३००० रूपये आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्या आहेत. यासंदर्भात नागरिकांनी या रुग्णालयात विचारणा केली असता, चाचणी सेंटर मधून आम्हांला कोणतेही अतिरिक्त शुल्क मिळत नसल्यामुळे आम्ही हा सेवा चार्ज घेत असल्याचे सांगितले. 

यासंदर्भात मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांच्याशी संपर्क साधला असता असे अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या सेंटरचे बिल घेवून नागरिकांनी मुलुंड येथील एम जी रोड येथील आमदार कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन केले असून सरकारी दरापेक्षा अतिरिक्त दर घेणाऱ्या सेंटरवर कारवाई व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट