कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेच्या एस वार्डातील ताळेबंदी ५ जुलै पर्यंत वाढविण्यात आली.
- by Adarsh Maharashtra
- Jun 25, 2020
- 1393 views
मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले)भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी व पवईच्या काही भागाचा समावेश असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या एस विभागातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा कालावधी दि ५ जुलै पर्यंत वाढविण्याचा निर्णय एस विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कुमार धोंडे यांनी घेतला असून यासंबंधीचे एक पत्रक त्यांनी आज जारी केले आहे.
गेल्या आठवड्यात ३५०० पर्यंत असलेली एस वार्डातील कोरोना रुग्ण संख्या काल रात्रीपर्यंत ४००० च्या जवळपास पोहचली होती. विनाकारण बाहेर फिरणारे उडानटप्पू , खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर होणारी नागरिकांची गर्दी, जीवनावश्यक वस्तू विकण्यासाठी जागोजागी अनधिकृतपणे बसलेले फेरीवाले, भाजीपाला विक्रेते व ह्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची होणारी झुण्बड त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव एस वार्डात मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने, ह्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी व कोरोनाला रोखण्यासाठी एस वार्डाचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानांना दि १९ जून पासून बंदी आणली होती, ही बंदी आता ५ जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून या कालावधीत भाजीपाला विक्री, फळ विक्री, फेरीवाले तसेच इतर सर्व दुकाने पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एस विभागातील संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना आदेशाचे पालन होण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे या पत्रकात सांगण्यात आले आहे.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम