
चेंबूर येथील आरसीएफ परिसरातील एचपीसीएल कंपनीची पाईपलाईन तोडून हजारो लिटर तेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!
- by Reporter
- Jun 25, 2020
- 581 views
मुंबई (जीवन तांबे) : आरसीएफ पोलिसांनी चेंबूर येथील आरसीएफ परिसरातील एचपीसीएल कंपनीची पाईपलाईन तोडून हजारो लिटर तेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
किशोर विश्वनाथ सिरसोदे - वय ३६ आणि मोहम्मद इरफान मोहम्मद हुसेन पठाण उर्फ राजू - वय २४ असे या आरोपीचे नांव आहे.
हे तेल माफिया कित्येक दिवसापासून हिंदुस्तान पेट्रोलियमची पाईपलाईन तोडत होते आणि नियोजित पद्धतीने बाजारात डिझेल विकत होते.
तांत्रिक ज्ञानाच्या आधारे व्यावसायिक तेल चोरत होते
काही व्यावसायिकांच्या तांत्रिक ज्ञानाच्या आधारे या टोळीने तेल कंपनीच्या मुख्य पाइपलाइनसाठी बोगदा बनविला होता. त्याला वाल्व्ह जोडून पाइपलाइन टाकली होती. डिझेल चोरी माफियांनी नियंत्रण भिंत लावली होती. या कंट्रोल वॉलच्या माध्यमातून ही टोळी हजारो लिटर डिझेलची चोरी करीत ती कंटेनरमध्ये जमा करीत होती आणि डिझेल स्वस्त दरात पेट्रोल पंप आणि कंपन्यांना विकत होते.
तेल कंपन्यांच्या वतीने सुरक्षा कर्मचारी म्हणून नेमणूक करूनही डिझेल चोरल्याबद्दल तेल कंपनीच्या अधिकाऱ्याना माहिती न देता घेण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हे काम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाल्यावर कंपनीच्या अधिकारी यांनी आरसीएफ पोलीस ठाण्याला दिली असता. आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सोपान निगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष कदम व गुन्हे शाखा अथकाने चौकशी केल्यानंतर या माफियांना अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
प्रतिक्रिया - वरिष्ठ निरीक्षक सोपान निगोटे - आरसीएफ पोलिस ठाणे
बीपीसीएल कंपनीच्या भिंत जवळ टँकर पार्किंगजवळील शिव अभियांत्रिकी कार्यशाळेच्या मागे तेल चोरी करण्याच्या उद्देशाने लोखंडच्या पाईपच्या सहाय्याने पॉईंट काढल्याचे निष्पन्न झाले. हे तेल माफिया उघडपणे हा व्यवसाय करीत होते.
या बाबत एचपीसीएल कंपनीने आरसीएफ पोलीस ठाण्याला दिली. त्यानुसार चौकशी करून तेल माफियांना अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
रिपोर्टर