पालिकेच्या बी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोरोनाला निमंत्रण; चिचबंदर मधील २००० रहिवाशांचे जीव धोक्यात
पाडलेल्या इमारतीचे रेबीट(डेब्रीज) उचलण्यास हेतुपूर्वक टाळा-टाळ
- by Adarsh Maharashtra
- Jun 25, 2020
- 1621 views
मुंबई : सध्या संपूर्ण मुंबई कोरोनाचां हॉट स्पॉट बनलेली असल्याने कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिका आयुक्त जीवाचे रान करीत आहेत असे असताना पालिकेच्या बी विभागातले अधिकारी मात्र स्वतःहून कोरोनाला आमंत्रण देवून नागरिकांचा जीव धोक्यात घालीत आहेत एरव्ही एखाद्या बिल्डर कडून पैसे खायचे असतील किंवा अनधिकृत बांधकाम करणाऱ्याला कारवाईचा धाक दाखवून त्याचा खिसा कापायचा असेल तर हे अधिकारी बाकीची कामे बाजूला ठेवून तिथे पहिली धाव घेतील पण चिचबंदर येथील १३/२१ जे. बी.शहा रोडवर असलेली रतन बाई इमारत पाडून अनेक दिवस उलटले तरी तिथले रेबीट व पत्र्याचे कुपंण काढण्यास मात्र हे लोक टाळाटाळ करीत आहेत प्रत्येक अधिकारी हे काम आमचे नाही असे सांगून आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत आहे .पाऊस सुरू झालाय हे रेबीट (डेब्रीज) रस्त्या लगत पडून आहे त्यातले काही गटारात पडल्याने गटारे चोकअप होवून त्या भागात पाणी साचू शकते आणि कोरोनाचे विषाणू या तुंबलेल्या पाण्यातून किंवा रेबीट (डेब्रीज) घाणीतून लोकांमध्ये पसरू शकतात स्वतः पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी तशी भीती व्यक्त करून आप आपल्या वार्ड मध्ये स्वच्छतेची काळजी घ्या असे आदेश दिले आहेत बिचारे आयुक्त स्वतः मुंबईमध्ये फिरून कोरोनाच फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत असताना बी विभागाच्या पालिका अधिकाऱ्यांनी मात्र आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवण्याचां जणू निर्धराच केल्याचे दिसत आहे
चिचबंदरच्या २३/२१ जे बी शाह रोडवर असलेल्या रतन बाई मेंनशन या इमारतीला जानेवारीत म्हाडाने धोकादायक घोषित केले त्यानंतर इमारीच्या भोवती पत्र्याचे कुंपण घालून इमारत पाडण्यात आली मात्र इमारत पाडल्यानंतर त्या इमारतीच्या रेबीट (डेब्रीज) ढिगारा उचलण्याचे काम सुधा तातडीने व्हायला हवे होते कारण अगोदरच या इमारती भोवती जे पत्र्याचे तात्पुरते कुंपण उभारले आहे ते अर्ध्या रस्त्यात असल्याने स्थानिकांना त्याचा त्रास होत होता लोकांनी याबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या पण म्हाडाने लक्ष दिले नाही आणि पालिकेनेही तक्रारींची दखल घेतली नाही कारण बी विभागाचे पालिका अधिकारी जिथे तिथे त्यांना पैसा मिळणार असेल तिथेच पटकन धावतात त्यांना नागरिकांच्या आरोग्याशी काही घेण देणे नाही आताही तसेच झालेय बिल्डिंग पाडून झाली तरी पत्र्याचे कुंपण आणि रेबीट (डेब्रीज) तिथेच पडून आहे म्हाडाकडून याबाबत विचारणा केली असता म्हाडाचे राव सांगतात आमच्याकडे लेबर नाहीत पालिकेच्या मेंटेनन्स विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल म्हैसकर हे तर स्थानिकांचा फोनही घ्यायला तयार नाहीत म्हणे मी आयुक्तांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये बिझी आहे नंतर सांगतात हे काम आमचे नाही तर घन व कचरा विभागवाले सांगतात ते काम मेंटेनन्स विभागाचे आहे अशी टाळा- टाळ सुरू आहे खरे तर पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच हे रेबीट (डेब्रीज) उचलण्याचे काम व्हायला हवे होते पण पाऊस सुरू झाला तरी हे रेबीट (डेब्रीज) उचलण्यास पालिकेच्या बी विभागाचे अधिकारी टाळा-टाळ करीत आहेत मात्र या लोकांच्या कामचुकार आणि नाकर्तेपणामुळे इथल्या आजूबाजूच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या २००० रहिवाशांना कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे तसे झाले त्याची संपूर्ण जबाबदारी पालिकेच्या बी विभागाच्या या कामचोर अधिकाऱ्यांवर असेल पालिका आयुक्त चहल यांनी या प्रकरणात लक्ष घालून म्हैसकर आणि त्याच्या सारख्या कामचोर अधिकाऱ्यांना याबाबत जबाबदार धरून त्यांना पालिकेच्या सेवेतून निलंबित करावे अशी मागणी इथल्या स्थानिक जनतेने केली आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम