अदानी इलेट्रिकसिटी कंपनीच्या मार्फत मीटर रीडिंगला सुरुवात ! प्रत्यक्ष वापराच्या आधारे व लागू टेरिफ स्लॅब्ज लाभ ग्राह्य धरून रक्कम कापल्या किव्हा जमा केल्या जातील!
- by Adarsh Maharashtra
- Jun 24, 2020
- 735 views
मुंबई दि. 24 (जिवन तांबे )मुंबई शहरात कोरोनाने थैमान घातले असल्याने सरकारने देशभर लॉकडॉउन सुरू असल्याने उपनगरात वीज रिडींग घेतले जात नसल्याने ग्राहकांना अंदाजे भरमसाठ देयक येत आहेत.
सध्या अन लॉक एक सुरू झाल्याने अदानी वीज कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत मीटर रीडिंग सुरू केले आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रत्येक्षात मीटर रिडींग करून वीज देयक देणे सुरू केले आहे. जूनमध्ये प्रत्यक्ष मीटर रिडींग घेतल्यानंतर ग्राहकांना समायोजित बिले मिळतील आणि प्रत्यक्ष वापराच्या आधारे व लागू टेरिफ स्लॅब्ज लाभ ग्राह्य धरून रक्कम कापल्या किव्हा जमा केल्या जातील.
ग्राहक एसएमएसद्वारे बिलाची सॉफ्ट कॉपी प्राप्त मिळण्याकरिता आपला मोबाइल क्रमांक नोंदवू शकतात. AMEL वेबसाइट: www.adanielectricity.com द्वारे MyAccount वरूनही बिलाची प्रत मिळवू शकतात.
प्रतिक्रिया:-
एईएमलचे एक प्रवक्ते :- “कोविड- 19 मुळे मार्च महिन्यापासून तात्पुरते थांबललेले मीटरचे प्रत्यक्ष वाचन आम्ही पुन्हा सुरू केले आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे मार्चपूर्वीचे तीन महिने हिवाळ्यातील असल्याने या महिन्यांत वीजवापर कमी असतो व या महिन्यांच्या सरासरीने तयार केलेली बिले तुलनेने कमी रकमेची होती. एप्रिल, मे आणि जून या महिन्यांतील प्रत्यक्ष वीजवापर उन्हाळ्यामुळे तुलनेने अधिक असतो. त्याचप्रमाणे लॉकडाउनचा परिणाम म्हणूनही वापर वाढला होता. आता ग्राहकांना त्यांच्या प्रत्यक्ष वापरानुसार योग्य त्या टेरिफ स्लॅब लाभांसह बिले प्राप्त होतील. मागील काळातील बिलांची रक्कम एमईआरसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मोजली जाईल
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम