ठाकरे सरकारमध्ये ‘आकडों की हेराफेरी’ - किरीट सोमैया
एमएमआर क्षेत्रातील कोवीड मृत्यू आणि रुग्णांच्या संख्येत प्रचंड तफावत
- by Adarsh Maharashtra
- Jun 24, 2020
- 801 views
गेल्या काही दिवसांत मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील कोवीड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या पाहिली तर काही ठिकाणी ती वाढताना दिसते तर काही ठिकाणी कमी झाल्याची गफलत दिसते. मुंबई आणि आसपासच्या महापालिका क्षेत्रांत कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, पालघर आणि पनवेल महानगरपालिकांमधील एकूण आकडे पाहिले, तर त्यात प्रचंड तफावत दिसत आहे. रुग्णांची संख्या लपवण्यासाठी ही तर ‘’आकडों की हेराफेरी” सुरु असल्याचा आरोप भाजप उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी केला आहे.
एकीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हरवल्याच्या बातम्या समोर येताना मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमधील मृत रुग्णांच्या एकूण आकडेवारीत आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतच तफावत असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या काही दिवसांच्या अहवालावरुन दिसून आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २३ जून २०२० आणि १७ जून २०२० या दोन अहवालातील काही फॅक्टस्
२३ जून २०२० १७ जून २०२०
Kalyan Dombivali ७४ Kalyan Dombivali ७७
Ulhasnagar ३२ Ulhasnagar ३७
Palghar १० Palghar १६
पनवेल ५२ पनवेल ५२
महापालिकांच्या आकडेवारीत मृत्यू झालेली रुग्ण संख्येत गोंधळ दिसतो. जी आकडेवारी २३ जून मध्ये दाखवलेली आहे, ती आकडेवारी ही १७ जूनला दाखवलेल्या आकड्यांपेक्षा कमी दर्शवली आहे. हा गोंधळ अनेक महापालिकांमधील आकडेवारीत झालेला दिसतो. नक्की हे काय चालू आहे ठाकरे सरकारच्या काळात, जिवंत माणसंही गायब आणि मृतही गायब !
(सचिव)
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम