सैन्याला प्रांत, धर्माचा भेदात अडकवू नका -आर.के. सिन्हा

गेल्या 15 जून रोजी चीनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात आमच्या वीर जवानांनी शत्रुचे कंबरडे कसे मोडले हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. लद्दाखच्या गलवान खो-यात सुमारे 14 हजार फुटांच्या उंचीवर भारतीय सैन्याच्या बिहार रेजीमेंटच्या जवानांनी हा पराक्रम गाजवला होता. यात बहुतांश जवान बिहार आणि झारखंड राज्यातील होते. परंतुते भारतीय सीमेच्या संरक्षणासाठी लढत होते. या पराक्रमी वीर पुत्रांच्या बलिदानाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. या घटनेनंतर असे लक्षात आले कीकाही संकुचित मनोवृत्तीचे लोक सैन्याच्या बिहार रेजीमेंटला बिहार राज्य समजत आहेत. अशा लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे कीबिहार रेजीमेंट म्हणजे बिहार नव्हे. त्यामध्ये विविध राज्यांमधील जवान असतात. त्यामुळे सैन्याच्या जवानांना राजनिहाय विभागणीच्या चष्म्यातून पाहणे अन्यायकारक ठरते. सैन्यातील जवान हा केवळ भारतीय असून त्याला अमुक राज्याचा प्रतिनिधी समजण्याची चूक कुणी करू नये. जे मुर्ख लोक बिहार रेजीमेंटला बिहार राज्य समजत असतील त्यांनी शहीद जवानांच्या नावांची यादी पाहिली तरी त्यांच्या डोळ्यावरील विभाजनाचा चष्मा बाजूला सारला जाऊन डोळ्यात आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडेल. बिहार रेजीमेंटचे कमांडिग ऑफिसर कर्नल बी. संतोश बाबू हे तेलंगणातील आहेत. त्यासोबतच सुभेदार एन. सोरेनमयूरभंज (ओड़ीशा)सुभेदार मनदीप सिंहपटियाला (पंजाब)हवलदार के पलानीमदुरै (तामीळनाडु)हवलदार सुनील कुमारपटणा (बिहार)हवलदार बिपुल रॉयमेरठ (उत्तर प्रदेश)सुभेदार सतनाम सिंहगुरदासपुर (पंजाब)दीपक कुमाररीवां (मध्य प्रदेश)शिपाई कुंदन कुमार ओझासाहिबगंज (झारखंड)शिपाई राजेश ओरंग बीरभूम (पश्चिम बंगाल)शिपाई गणेश रामकांकेर (छत्तीसगड)चंद्रकांत प्रधानकंधमाल (ओड़ीशा)शिपाई अंकुशहमीरपुर (उत्तर प्रदेश)शिपाई गुरबिंदरसंगरूर (पंजाब)शिपाई गुरतेज सिंहमनसा (पंजाब)शिपाई चंदन कुमारभोजपुर (बिहार)शिपाई अमन कुमारसमस्तीपुर (बिहार)शिपाई जयकिशोर सिंहवैशाली, (बिहार) इत्यादींचा यात समावेश होता. उपरोक्त नावे आणि पत्ते लक्षात घेता असे स्पष्ट होते कीहे सर्व सैनिक विविध राज्यांमधून आले होते. बिहार रेजीमेंटचे केंद्र पटणा शहरानजीकच्या दानापूर येथे आहे. त्यामुळे या रेजीमेंटमध्ये बहुतांश सैनिक बिहार आणि झारखंड राज्यातील असतात. परंतुत्यासोबतच इतर राज्यांमधील जवानांचा देखील या रेजीमेंटमध्ये समावेश असतो. त्यामुळे बिहार रेजीमेंटमध्ये सर्वच बिहारी असतात असे म्हणण्याला काहीही अर्थ नाही. 

 

 यासंदर्भात भूतकाळाचा दाखला देताना असे सांगता येईल कीइंग्रजांनी 1941 साली बिहार रेजीमेंटची स्थापना केली होती. त्याकाळी 11 व्या टेरिटोरियल बटालियन आणि 19 व्या हैदराबाद रेजिमेंटला नियमीत करत नवीन बटालियन स्थापन करण्यात आल्या होत्या. या सर्व बटालीयन भारतीय सैन्याच्या पायदळ फौजेचा भाग आहेत. भारतीय सैन्यातील बिहारचे सर्वात मोठे योद्धे आणि युद्धा नितीचे जाणकार म्हणून विशिष्ट सेवा मेडल पटकावणारे लेफ्टनंट जनरल श्रीनिवास कुमार सिन्हा यांचे नाव घेता येईल. सैन्यातून सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अरूणाचल प्रदेश आणि मध्यप्रदेशचे राज्यपाल म्हणूनही काम केले आहे. श्रीनिवास कुमार सिन्हा 1943 साली सैन्यात भर्ती झाले होते. त्यांची नेमणूक गोरखा रेजीमेंटमध्ये करण्यात आली होती. ज्यावेळी पाकिस्तानने कबायली टोळ्यांच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरवर हल्ला केला त्यावेळी त्यांच्या प्रतिकारासाठी गेलेल्या भारतीय सैन्याच्या पहिल्या तुकडीत श्रीनिवास कुमार सिन्हा यांचा देखील समावेश होता. ज्यावेळी इंदिरा गांधींच्या कार्यकाळआत श्रीनिवास कुमार सिन्हा यांची सेवा ज्येष्ठता डावलून त्यांच्या ऐवजी जनरल अरुण वैद्य यांना भारतीय सैन्याचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले त्यावेळी सिन्हा यांनी सैन्यातून निवृत्ती पत्करणे पसंत केले. त्यानंतर 1990 साली त्यांना नेपाळमध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते. श्रीनिवास कुमार सिन्हा यांनी एकूण पाच पुस्तके लिहीली असून त्यात ए सोल्जर रिकॉल्स’ नामक त्यांच्या आत्मचरित्राचा देखील समावेश आहे. मुळचे बिहारचे असून देखील श्रीनिवास कुमार सिन्हा गोरखा रेजीमेंटमध्ये होते. सैन्याला एखाद्या प्रांताशी जोडण्याचा प्रयत्न करणा-यांना या उदाहरणावरून स्पष्ट झाले असेल कीसैनिक आणि प्रांत यांचा तसूभरही संबंध नसतो. त्यासोबतच भारताचे फिल्ड मार्शल सॅम होर्मूसजी फ्रेमजी जमशेदजी माणेक शॉ यांचा देखील आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. भारत-पाकिस्तान यांच्यात 1971 साली झालेल्या बांगलादेश युद्धात पूर्व पाकिस्तानला तोडून त्याचा बांगलादेश बनवणा-या योजनेचे ते शिल्पकार होते. त्यांचा जन्म पंजाबच्या अमृतसर शहरात झाला होता. त्यांचे कुटुंब गुजरातच्या वलसाड येथून पंजाबमध्ये स्थायिक झाले होते. माणेकशॉ देखील गोरखा रेजीमेंटमध्ये कार्यरत होते. त्याकाळी भारतीय सैन्याचे जवान त्यांना सॅम-बहादूर असे संबोधित करीत असत. फिल्ड मार्शल माणेकशॉ यांच्या प्रमाणेच हैदराबादच्या पारशी कुटुंबात जन्मलेले जनरल फर्दून बिलीमोरिया देखील गोरखा रेजीमेंटचे अधिकारी होते. तर 1971 च्या महानायकांमधील एक असलेले लेफ्टनंट जनरल जे. एफ. आर. जेकब हे ज्यू होते. त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे 1971च्या युद्धात पाकिस्तानच्या 92 हजार सैनिकांनी भारतापुढे शरणागती पत्करली होती. इतकेच नव्हे तर माजी सेना प्रमुख जनरल जे.जे. सिंह हे मराठा रेजीमेंटचे होते. यावरून असे स्पष्ट होते कीभारतीय लष्करात जातभाषाप्रांतक्षेत्र याला तसूभरही महत्त्व दिले जात नाही. केवळ देशप्रेम आणि पराक्रम याबळावरच सैन्यात माणसे ओळखली जातात.

 

भारतापुढे असलेले चीनचे आव्हान अजून संपुष्टात आले नसून ही तर केवळ सुरूवात आहे. वर्तमानात सीमेवर दोन्ही देशांच्या फौजा सज्ज आहेत. यावेळी संपूर्ण देशाने सतर्क राहण्याची गरज आहे. यासोबतच भारतात राहून देशाला आतून पोखरणा-या दुष्ट शक्तींचा बंदोबस्त करण्याची देखील गरज आहे. युद्धजन्य परिस्थितीतही अरूंधती रॉयकन्हैय्या कुमार सारखे माथेफिरू आणि तथाकथित लिबरल लोक सैन्यावर घृणित आरोप करतात. परंतुजगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हे लोक वेळोवेळी दुरूपयोग करताना दिसून येतात. आजवर देशात कुणीही त्यांच्या आरोपांना गांभीर्याने घेतलेले नाही. वास्तविक पाहता भारीय सैन्य हे भारतीय संस्कृतिचे प्रतिबिंब आहे. सैन्यातील सर्वच धर्माच्या लोकांनी देशासाठी रक्त सांडवले आहे. हे भेदविरहीत राष्ट्रप्रेमच आमच्या सैन्याला जगातील सर्वश्रेष्ठ सैन्य बनवते.

 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट