देशात कोरोनाचा कहर; गेल्या २४ तासात ३१२ जणांचा मृत्यू,१४९३३ जणांना लागण

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : देशात कोरोना रुग्णांची संख्या सलग चढत्या क्रमावर आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अकडेवारीनुसार देशात कोरोना रुग्णांची संख्या ४ लाख ४० हजार २१५ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत २ लाख ४८ हजार १९० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून देशात १ लाख ७८ हजार १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १४ हजार ११ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

गेल्या २४ तासांत देशात ३१२ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तर १४ हजार ९३३ नवे रुग्ण समोर आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत १ लाख ३५ हजार ७९६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये ६१ हजार ८०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ६७ हजार ७०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. शिवाय मुंबई आणि दिल्लीत करोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे या शहरांमध्ये नमुना चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट