माणुसकी फाऊंडेशनचे सेवाभावी कार्य

मुंबई (प्रतिनिधी) : माणुसकी फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे कोविड-१९ सेंटर मध्ये कोरोना बाधित रुग्णांना दूध वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच ग्रीन वर्क ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग चक्री वादळग्रस्त रोह व माणगाव येथे मदत पथके पाठीवण्यात आली होती. यापैकी एका दौऱ्यात रोह येथील फणसाड अभयरण्यातील  आदिवासी पाड्यांना भेट देऊन सुमारे २०० निराधार आदिवासी कुटुंबाना संस्थेतर्फे मोफत धान्य वाटप करण्यात आले. तसेच येथे आलेल्या चक्री वादळाने पडलेली झाडे व घरे याची पाहणी करून शासकीय व इतर मदत करण्यासाठी पाठपुरावा संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास संस्थेचे स्वयंसेवक व दाते यांनी भरपूर मदत केली.

माणुसकी फाउंडेशनचे स्वयंसेवक मिलिंद कांबळी यांनी त्यांच्या ९१ स्प्रिंगबोर्ड कंपनीच्या मॅनेजमेंटशी चर्चा करून सुमारे १ हजार लीटर दूध हे देणगी स्वरूपात माणुसकी फाऊंडेशनला मिळवून दिले. सदर दूध पुण्यातील स्वयंसेवकांच्या मदतीने मुंबईत  आणण्यात आले. या दुधाचे वाटप मंत्री आदित्य ठाकरे साहेब, यांच्या मार्गदर्शनाने आणि मुंबई महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या सहकार्याने मुंबई महानगर पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कोविड-१९ सेंटर येथे कोरोना बाधित रुग्णांना करण्यात आले. यावेळी माणुसकी फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. प्रसाद मालपेकर , सचिव सुहास मालुसरे व सहाय्यक स्वयंसेवक रवींद्र मोरे, धीरज कानसे , वाहन चालक चंद्रेश यांनी प्रत्यक्षपणे विविध कोविड सेंटर येथे जाऊन रुग्णांना दुधाचे वाटप केले.

संबंधित पोस्ट