कोरोना प्रादुर्भावामुळे आषाढी वारी भरणार नसल्याने पंढरपूरकर आर्थिक संकटात.
- by Adarsh Maharashtra
- Jun 22, 2020
- 1311 views
मुंबई (भारत कवितके)जागतिक कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासन व वारकरी यांच्या सहमतीने कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून शासकिय आदेश काढून या वर्षी आषाढी वारी भरणार नसल्याचे जाहीर केले.
पंढरपूर शहरात वर्षातून चार मोठ्या यात्रा भरतात,चैत्री,माघी ,आषाढी ,कार्तिकी .यापैकी आषाढी व कार्तिकी या दोन यात्रा पंढरपूरकरांच्या द्दष्टीने आर्थिक लाभ देणार्या असतात.पढरपूरातील मूर्ती, फोटो, प्रसाद, पेढा,बताशे,चुरमुरे,तुलसीमाळा,अबीर,गुलाल,गोपीचंद,हळद,कुंकू,बागड्या,चुडे,लहान मुलांची खेळणी,प्रवाशी बँगा वगैरे वगैरे वस्तूंची दुकाने खच्चाखच भरून विक्रीसाठी ठेवण्यात आलेली असतात.लाँज,निवासी गाळे ही भाड्याने देण्यात येऊन चांगलीच कमाई करण्यात येते.विठ्ठल मंदिरात भक्तां कडून प्रचंड मोठ्या प्रमाणात देणगी,दक्षणा स्वरूपात आर्थिक मदत म्हणून जमा होत असते,महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे रेल्वेचे उत्पन्न ही या यात्रा कालावधीत प्रचंड वाढत असते.पण या वर्षी मात्र आषाढी यात्रे अभावी सर्वांवरच आर्थिक संकट ओढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.आषाढी वारी म्हणजे पंढरपूरकरांसाठी सुवर्ण संधीच असते.पण यावर्षी मात्र आषाढी वारी भरणारच नसल्याने पंढरपूरकर या सुवर्ण संधी पासून वंचीतच राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.पंढरपूरातील लहान मोठा व्यापारी वर्ग यामुळे चांगलाच हवालदिल झाला आहे.जागतिक कोरोना महामारी रोखण्यासाठी शासनचा निर्णय योग्य असल्याने निर्णयाचे पंढरपूरकरांकडून स्वागतच होत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम