नेरळ शहरात पोलिस योद्धांना कोरोना! कर्जत तालुक्यांतील नेरळ “हाॅटस्पाॅट”!

कर्जत(धर्मानंद गायकवाड);- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील नेरळ शहरात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. नुकताच कर्जत तालुक्यांतील अनेक पोलिस योद्धांना आणि नेरळ ग्रामपंचायतीचा एका कर्माचाऱ्याचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आल्याने संपुर्ण नेरळ शहरात घबराहाटीचे वातावरण पसरले असुन नेरळ पोलिस ठाणे आणि नेरळ ग्रामपंचायतीचे काही कर्मचारींसह नेरळचे काही नागरीक प्रंचड चिंतेत सापडले आहेत.

 कर्जत तालुक्यांत दोन लाॅक डाऊन मध्ये नियंत्रणात असलेली परिस्थितीती तिसऱ्या आणि चौथ्या लाॅकडाऊन नंतर पुर्णत; बदलून गेली आहे. शासनाचा विविध सुचनाकंडे येथिल नागरीकांकडुन दुर्लक्ष  करण्यात येत असल्याने कर्जत तालुक्यांतील कोरोनाचा आकडा आता तब्बल ६० च्या वर पोहोचला आहे. कर्जत तालुक्यांतील जनतेचे रक्षण करीत असतानाच २४ तास सतर्क राहुन सेवा बजावत असणाऱ्या कर्जत आणि नेरळ शहरातील अनेक पोलिस योद्धांना केरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संरक्षण करणारेच बाधित झाल्याने कर्जत तालुक्यांतील सुज्ञ जनता आता पूरती धास्तावली आहे.

विशेष म्हणजे कर्जत तालुक्यांतील विविघ गुन्ह्यातील आरोपी कोरोनाग्रस्त असल्साने या आरोपींशी थेट संपर्क आल्यानेच अनेक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नेरळ पोलिस ठाणे एका पत्नीवर कुऱ्हाडीने वार करणारा आरोपी कोरोना पाॅझीटीव्ह आढळल्याने या आरोपी सोबत थेट संपर्क आल्याने नेरळ पोलिस ठाणेचे पोलिस योद्धांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जीवाशी खेळत रक्षण करणाऱ्या या योद्धांना जनतेने साथ द्यावी, तसेच कर्जतचा जनतेने शासनाचे नियम पाळावेत असे आवाहन करण्यात येत आहे.

    दरम्यान कर्जत तालुक्यांतील कर्जत

पोलिस ठाणे पाठोपाठ नेरळ पोलिस ठाणेचे पोलिस योद्धे आता कोरोनाग्रस्त झाल्याने नेरळ शहरातील कोरोनाची संख्या वाढीस लागली आहे. तसेच नेरळ ग्रामपंचायतीचा एका कर्मचाऱ्यासही कोरोना झाल्याने आता नेरळ शहर कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनत असल्साची चर्चा आहे, नेरळकरांनी शासनाचा सुचनांकडे लक्ष न दिल्यास पुढील कालात नेरळ शहरात कोरोना प्रंचड वाढून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकरता येत नाही. नेरळ शहरात कोरोनाची वाढती संख्या पाहाता नेरळ शहर सध्या संकटात असल्याने नेरळकरांमघे भितीचे वातावरण पसरले आहे. नेरळ मधील पोलिस योद्धांना कोरोनाची लागण झाल्याने या पोलिसांची संपर्कात आलेल्या अनेक जणांना कोरोनाची लागण होणेची शक्यता नाकरता येत नाही. तसेच नेरळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी गुन्ह्याकामी घेणेत आल्याने नेरळ ग्रामपंचायतीचा कर्मचारीही कोरोना पाॅझीटीव्ह आला आहे. त्यामुळे आता नेरळ शहरात कोरोना वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर आणखी वयोव्रुद्ध महीलेचा आज कोरोनाने म्रत्यु झाल्याचे समोर आले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट