शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू होणेच गरजेचे, शासनाचा निर्णय स्वागतार्ह रमेश खानविलकर

मुंबई शिक्षकांच्या संघटना नेत्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. कोरोना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा व शिक्षण टप्पा – टप्प्याने सुरु करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने शासन परिपत्रक क्र.सैकिर्ण – २०२० | प्र.क्र.८६ | एस.डी-६ दि.१५ जून २०२० अन्वये निर्गमित केलेले परिपत्रक अत्यंत योग्य व विद्यार्थी, पालक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी यांना मार्गदर्शनपर असून अत्यंत योग्य अशा सूचना व मार्गदर्शन आहे पण तो जाहिर करण्यात दिरंगाई झाली, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
आमदार कपिल पाटील यांनी दि. १२ जून २०२० रोजी मुख्यसचिवांना एक पत्र दिले सदर पत्रात दि.१५ जूनला शाळा व शिक्षण सुरु करण्यासाठी योग्य मार्गदर्शन शासनाकडून व्हावे व शिक्षक / शालेय व्यवस्थापन / प्रशासन यांच्यात कोठे हि वाद होवू नये, असे म्हटले आहे. तसेच शिक्षक आमदारांनी देखील शाळेत शिक्षकांनी हजर राहू नये असे पत्रात कोठेही म्हटले नाही पण काही स्व:घोषित “शिक्षक नेत्यांनी’’ परस्पर “शिक्षकांनी शाळेत हजर राहू नये ”, असे आदेश वॉटसअॅप ने फिरवले. त्यामुळे काही शाळेत “एक ही’’ शिक्षक शाळेच्या पहिल्या दिवशी हजर नव्हते हे घातक आहे. विद्यार्थी, शाळा, शिक्षण हे विसरुन “नेतेपणा’’ शिक्षक नेते करू लागले, अशी खरमरीत टीकाही श्री. खानविलकर यांनी केली आहे.
शासन शाळा व शिक्षणाबाबत सकारात्मकपणे जो विचार करत आहे त्याला मदत व सहकार्य कोणत्याही परिस्थितीत करणे हा शिक्षकाचा धर्म आहे. अशी भूमिका दिसली असती तर पालकांचे व विद्यांर्थ्याचे मनोबल वाढले असते. स्वयं घोषित शिक्षकांच्या नेत्यांनी जी दि. १४ जून ला भूमिका घेतली ती चुकीची होती पण त्याला कारणीभूत शासनाचे प्रशासनातील अधिकारी आहेत पण मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी वेळीचे प्रशासनास आदेश देवून परिपत्रक काढले. पण उशिरा का होईना मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शिक्षणमंत्री प्रा. वर्ष गायकवाड यांनी दि. १५ जूनला योग्य निर्णय घेतला त्या निर्णयाचे सर्व शिक्षकांनी सकारात्मक दृष्टीकोनातून व शासनास शाळा व शिक्षण सुरु ठेवण्यासाठी वाटेल ती किंमत मोजून सहकार्य व मदत करण्याची भूमिका घेणे आवश्यक आहे विद्यार्थी व पालक यांचे मनोबल वाढवणे आवश्यक आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
रमेश खानविलकर असेही म्हणाले कि,शासनाने महाराष्ट्र राज्य टंकलेखन व संगणक टायपिंग शिक्षण देणाऱ्या ३५०० शिक्षण संस्थाच्या बाबत त्या सुरु करण्यासाठी तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे तेथे हि सुमारे २,५०,००० विद्यार्थ्यांचा प्रश्न प्रलंबित आह

संबंधित पोस्ट