खासदार मनोज कोटक यांच्यामार्फत आयोजित ३७१ वे मोफत आरोग्य शिबिर विक्रोळीत संपन्न

मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) : खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रोळीतील कन्नमवार नगर, टागोर नगर सारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांची कोविड तपासणी करण्यासाठी नियमितपणे वैद्यकीय शिबिरांचे आयोजन खासदार मनोज कोटक 
यांच्यामार्फत करण्यात येत आहे. विक्रोळीतील ४३ व्या व एकूण ३७१ व्या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन 
बीजेएस आणि एमसीएचआई यांच्या माध्यमातून 
शुक्रवार दि १९ जून रोजी दाजी वाडी, कन्नमवार नगर २ येथे करण्यात आले होते. या शिबिरात ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी या आजाराने ग्रस्त नागरिकांची तपासणी करुन त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रोळी परिसरातील एकूण २५० गरजू नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला. यावेळी भाजपाचे सर्व पुरुष आणि महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट