मुंबई काँग्रेस कार्यकर्त्यांद्वारे चीनी राष्ट्रपतींच्या प्रतिमेचे दहन.
- by Reporter
- Jun 22, 2020
- 360 views
मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) लडाख, गलवान घाटी येथील सीमेजवळ चीनी सैनिकांद्वारे २० भारतीय सैनिकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या भ्याड घटनेचा निषेध करण्यासाठी मुलुंडच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चीन सरकारच्या विरोधात घोषणा देवून चीनचे राष्ट्रपती क्षि जिनपिंग यांच्या प्रतिमेचे दहन केले. कॉंग्रेस नेते राजेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निषेध आंदोलनात शेखर परदेशी, संतोष गांवकर, मोकिम खान, संजय झा, राहुल मौर्या आदि सहभागी झाले होते.

रिपोर्टर