कर्जत तालुक्यांत कोरोनाचा संसर्ग आता शासकीय अधिकाऱ्यांनाही झाल्याने कर्जतमध्ये सर्वत्र घबराहाट! कर्जत तालुका कोरोनाचा भितीचा सावटाखाली!
- by Reporter
- Jun 22, 2020
- 869 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड): रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या सर्व भागात कोरोनाचा संसर्ग पोहचला असतानाच आता पोलिसांच्या मागेही कोरोना लागला असल्याचे चित्र दिसत आहे. कर्जतमधे कस्टडी मधील एका आरोपी मुळे कर्जत पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस अधिकऱ्यांसह कर्जतमधील एक महसूल अधिकारीही कोरोनाग्रस्त झाले आहेत, तसेच नेरळ पोलीसांच्या कोठडीत असलेल्या आरोपीमुळे तेथील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.दरम्यान, कर्जत तालुक्यात काल आणि आज आणखी सहा कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 57 पर्यंत पोहचली आसल्साने सर्वत्र घबराहाट पसरली आहे.
नुकताच काही दिवसांपूर्वीच कर्जत पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील आरोपी कर्जत तहसिल कार्यालयाच्या कोठडीत असताना कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्या 25 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह आरोपी तरुणाच्या संपर्कात आल्याने कर्जत पोलोस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. तर एका पोलिसाची पत्नी देखील कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. तसेच कर्जत पोलीस ठाण्यात बिनतारी संदेश विभागात काम करणाऱ्या 36 वर्षीय पोलीस कर्मचारी यांचे कोरोना टेस्टचे अहवाल 19 जून रोजी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे खळबळ माजली असतानाच काल नेरळ पोलीस ठाण्यात दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 40 वर्षीच्या आरोपीला नेरळ पोलीस ठाण्याच्या कोठडीत कोरोना झाला आसल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे या आरोपीच्या संपर्कात आल्याने नेरळ पोलीस ठाण्यातील एक ५५ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकांना सुद्धा कोरोना ची लागण झाली आहे. त्यांचे कोरोना अहवाल काल सांयकाळी पॉझिटिव्ह आल्याने या पोलीस उपनिरीक्षकांचा संपर्कात आलेल्या नेरळचा अनेक पोलीसांनाही कोरोन्टाइन करण्यात आले आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यांतील पोलिसांना कोरोना ची लागण होण्याचे प्रमाण प्रंचड वाढले असल्याने पोलिस खात्यात हाहाःकार उडाला आहे. तर कर्जत तहसिल कार्यालयात यापूर्वी पुरवठा अधिकारी पदावर काम करणारे 52 वर्षीय महसूल विभागातील नायब तहसीलदार यांचे कोरोना टेस्टचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या पेण तहसिल कार्यालयात ते सेवा बजावत असले तरीही हे महसूल अधिकारी कर्जत शहरातील एका भागात राहत असल्याचे समोर येत आहे. .
दरम्यान नेरळ गावातील खांडा भागातील कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टर यांची पत्नी आणि 6 वर्षाची मुलगी यांच्या कोरोना टेस्टचे अहवालही 19 जून रोजी रात्री प्राप्त झाले आहेत, त्या दोघीही पॉझिटिव्ह आढळुन आल्या आहेत. तर ममदापुर गावातीलही एक वयस्करास कोरोना झाल्याचे समजते आहे. ममदापुर येथील या वयोवृद्ध महिला अन्य आजारांनी त्रस्त होत्या आणि त्यात त्यांना कोरोना ची लागण झाली आहे. तसेच कर्जत तालुक्यातील नेरळ गावात सध्या टेपआळी, मोहाचीवाडी आणि खांडा या भागात कोरोना चे काही ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ममदपूर ग्रामपंचायत मध्ये ममदापुर गावात एक आणि या ग्रामपंचायत मधील एका इमारतीत तीन रुग्ण आहेत, तर एक रुग्ण भडवळ गावात आणि एक रुग्ण झेंडेवाडी मध्ये आहे. कर्जत शहरात दोन पोलीस आणि एक महिला असे तीन रुग्ण सध्या कोरोना वर उपचार घेत आहेत. मात्र कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या थेट पन्नाशी पार करून आता 57 वर पोहचली आसल्याने कर्जत तालुका कोरोनाचा भितीचा सावटाखाली असल्याचे बोलले जात आहे.
रिपोर्टर