
शिवसेना वर्धापनदिनानिमित्त मुलुंडला वृक्षारोपण संपन्न
- by Reporter
- Jun 22, 2020
- 551 views
मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) : शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना मुलुंड विधानसभेच्या वतीने विभागात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलुंड पश्चिम येथील निवडक सोसायटयांमध्ये त्यांच्या इच्छेनुसार त्यांना आवश्यक असलेल्या विविध फळ व फुल झाडांचे सोसायट्याच्या प्रांगणात सोसायटीतील सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षांचे संगोपन करण्याची ग्वाही गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकारयांनी घेतली. पेरू, फणस, आंबा, बकुळ, अर्जुन, पारिजातक अश्या अनेक जातींच्या झाडांचा यात समावेश होता. तसेच लालबहदूर शास्त्री मार्ग, वालजी लद्धा रोड, व्ही. पी. रोड या रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली.
सदर कार्यक्रमास उपविभागप्रमुख सुनील गारे, मा. उपविभागप्रमुख प्रकाश वाघ, विधानसभा कार्यालय प्रमुख सीताराम खांडेकर, शाखाप्रमुख बाबा भगत, आनंद पवार, संजय दळवी, निलेश मोरे, युवासेनेचे अमित चव्हाण, प्रियांका लाडके, ग्राहक संरक्षण कक्षाचे दिपेश तुपे, प्रदीप ठोंबरे, तसेच समस्त महिला व पुरुष शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन उपविभागप्रमुख दिनेश जाधव यांनी केले होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "टी" वार्ड उद्यान विभागाने या वृक्षारोपण कार्यक्रमास विशेष सहकार्य केले..
रिपोर्टर