जनधन खाते उघडण्यासाठी गरीब महिलांकडून प्रत्येकी १०० रूपये लाटण्याचा मुलुंडमध्ये प्रकार

मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) : लॉकडाऊनमुळे केंद्र सरकार जन धन खाते असलेल्या गरीब महिलांच्या खात्यात काही आर्थिक सहाय्य टाकणार असल्याची घोषणा करण्यात आल्याने व काही गरीब महिलांना एप्रिल महिन्यापासून हा आर्थिक लाभ मिळायला सुरुवात झाल्याने राष्ट्रीयकृत बँकेबाहेर तर काही बँकेच्या बिझनेस करस्पॉण्डंट' (बीसी) च्या 
कार्यालयाबाहेर हे खाते उघडण्यासाठी महिलांनी गर्दी केल्याने दिसून येत आहे. परंतु गरीब महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेत काही बिझनेस करस्पॉण्डंट' (बीसी) त्यांची लूटमार करत असल्याचे एक प्रकरण मुलुंडमध्ये उघडकीस आले आहे.    

पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत देशातील गरीब लोकांना राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफीस मध्ये झीरो बेलेन्स मध्ये तसेच कोणतेही पैसे न देता खाते उघडता येणार असूनही मुलुंड पश्चिमेला प्रकाश शिंदे हा युनियन बँक ऑफ इंडियाच्या मुलुंड पश्चिम शाखेने तांबे नगर विभागासाठी नेमलेला बिझनेस करस्पॉण्डंट' (बीसी) हे खाते उघडण्यासाठी येणाऱ्या गरीबांकडून १०० रूपये आकारत असल्याचे आढळून आले आहे. मुलुंड पश्चिमेतील शिधापत्रिका कार्यालयाच्या बाजूला असलेल्या सत्यकाम इमारतीत दुकान नंबर २ मध्ये या प्रकाश शिंदेचे आधार एनजीओ या कार्यालयात गरिबांना लुटण्याचे हे प्रकार खुलेआम चालू असल्याचे समोर आले आहे.  

बँक किंवा बँकेच्या बिझनेस करस्पॉण्डंट' (बीसी) च्या कार्यालयात जावून देखील कोणतेही पैसे न देता गरीब आपले जन धन खाते उघडू शकतात, असे असूनही प्रकाश डी शिंदे हा युनियन बँकेचा बिझनेस करस्पॉण्डंट' (बीसी) १०० रूपये आकारत असल्याची तक्रार अनिकेत येरुणकर या भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्याकडे आली होती. त्या तक्रारीनुसार अनिकेतने तेथे चौकशी केली असता प्रत्येक गरीबांकडून खाते उघडण्यासाठी १०० रूपये हा एजेंट आकारत असल्याचे त्याला समजले तसेच तेथे उपस्थित असलेल्या महिलांनी देखील याला दुजोरा दिला त्यामुळे अनिकेत येरुणकर याने एक वीडियो बनवला व त्यात गरीबांना कश्या प्रकारे लुटले जात आहे, हे या वीडियोत सांगितले. या वीडियोत गरीबांची लूटमार आधार एनजीओ नामक संस्था चालवणारे प्रकाश शिंदे करत असल्याचे म्हटले असून गेल्या ४ ते ५ दिवसांत जनधन खाते उघडण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक गरीबांकडून प्रकाश शिंदेने १०० रूपये घेतल्याचे वीडियोत म्हटले आहे तसेच या संस्था चालकावर गरीबांची लूटमार करण्या प्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

हा वीडियो मुलुंडमध्ये सर्वत्र वायरल होत असल्याने युनियन बँकेचा संबंधित बिझनेस करस्पॉण्डंट' (बीसी) प्रकाश शिंदे याना भेटून त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले असता त्याने जनधन खाते उघडण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाकडून हे १०० रूपये घेतले जातात हे मान्य केले असून त्याबदल्यात त्यांना अकाऊंट ओपन करुन दिले जाते तसेच एटीएम डेबिट कार्ड, पासबुक, इत्यादी सुविधा देखील दिल्या जातात तसेच अकाउंट उघडल्यानंतर काही काळाने हे पैसे खातेधारकांच्या खात्यात पुन्हा जमा होतात, असे प्रकाश शिंदे यांनी सांगितले.

परंतु जनधन खाते हे पूर्णपणे मोफत आणि कोणतेही पैसे न देता गरीब उघडू शकत असताना आधार एनजीओचे प्रकाश शिंदे हा युनियन बँक ऑफ इंडियाचा बिझनेस करस्पॉण्डंट' (बीसी) गरीबांकडून १०० रूपये आकारात असल्याबद्दल तसेच गरीबांना लुटत असल्याबद्दल युनियन बँकेने तसेच पोलिसांनी याची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे येथील उपस्थित महिलांनी मागणी केली आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट