एम.डी.केणी विद्यालय भांडुप(पुर्व)येथील गरजू विद्यार्थी-विद्यार्थींनींना डाँ.प्रशांत शिंदे यांचे सहकार्य

१०० मुलांना जीवनावश्यक वस्तुंचे गुरुजन शिक्षण प्रसारक मंडळतर्फे वाटप

मुंबई(शांत्ताराम गुडेकर ) गुरुजन शिक्षण प्रसारक मंडळ संचालित एम.डी केणी विद्यालय भांडुप(पूर्व) शाळेची स्थापना १९९३ साली प्रिं. परमेश्वर शिंदे सरांनी केली.सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून गेली २७ वर्ष ज्ञानदानाचे पवित्र कार्य येथे अखंडपणे सुरू आहे या शाळेत अतिशय गरीब कुटूंबातील कागदाच्या घरात राहणारी मुले शिक्षण घेत आहेत शाळेत वर्षभर अनेक उपक्रम राबविले जातात मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते सामाजिक संघटना, शिक्षक, संचालक मुलांना सर्वतोपरी मदत करीत असतात. सध्याचा कोरोना अडचणीच्या काळात शाळेतील १०० हुन गरजु मुलांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.यावेळी संस्थापक संचालक डॉ. प्रशांत शिंदे, संचालक शशिकांत माने मुख्याध्यापिका प्रोयुशा भोसले व सर्व गुरुजन उपस्थित होते.भविष्यातही या विधार्थीना जमेल तसे सहकार्य आम्ही करतच राहू असा विश्ववास यावेळी संचालक मंडळाने व्यक्त केला. 

संबंधित पोस्ट