
महालक्ष्मी ग्रेन स्टोअर्स या रेशनिंग दुकानातून निकृष्ट दर्जाच्या डाळीचे ग्राहकांना वाटप
- by Reporter
- Jun 19, 2020
- 514 views
मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) : महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणखात्यामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत शिधावाटप दुकानातून मोफत तूरडाळीचे वितरण शिधापत्रिका धारकांना करण्यात येत आहे. या योजनेनुसार मुलुंड पूर्व येथील वासुदेव बळवंत फडके मार्गावर असलेल्या महालक्ष्मी ग्रेन स्टोअर्स या रेशनिंग दुकानातून शिधापत्रिकाधारकांना अत्यंत निकृष्ट दर्जाची तूरडाळ देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. या तूरडाळीला किडे पडलेले दिसत असून डाळीत खडे देखील मोठ्या प्रमाणात मिक्स केले असल्याचे आढळून आले आहे मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनी नवघर गांव आंबेडकर नगर झोपडपट्टी, इत्यादी विभागातील शिधापत्रिकाधारकांना वासुदेव बळवंत फडके मार्गावर असलेल्या महालक्ष्मी ग्रेन स्टोअर्स या रेशनिंग दुकानातून शिधावाटप केले जाते. कोरोणाची पार्श्वभूमीवर व लॉकडाऊन यामुळे शासनातर्फे मोफत तूरडाळचे वाटप शिधापत्रिकाधारकांना करण्यात येत आहे. परंतु महालक्ष्मी ग्रेन स्टोअर्स मधून अत्यंत निकृष्ट दर्जाच्या तूरडाळीचे वाटप करण्यात येत असून, या तूरडाळीत असंख्य खडे असल्याचे दिसून आले असून डाळीला कीड लागलेली देखील दिसून येत आहे. यासंबंधीच्या तक्रारी अनेक शिधापत्रिकाधारकांनी केल्या आहेत. शासनाकडून आलेली चांगल्या दर्जाची डाळ बदलून त्याजागी ही निकृष्ट दर्जाची डाळ दिली जात आहे अशी तक्रार राहूल वानखेडे यांनी केली आहे नागरिकांच्या तक्रारीनुसार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी महालक्ष्मी ग्रेन स्टोअर्स या रेशन दुकानात जावून डाळ तपासली असता किडे लागल्याने डाळ पोखरली असल्याचे दिसून आले तसेच डाळीत खडे असल्याचे देखील दिसून आले. महालक्ष्मी ग्रेन स्टोअर्स या शिधावाटप दुकानदाराला यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी शासनाकडून जी डाळ आली तीच डाळ शिधापत्रिकाधारकांना दिली जात आहे, असे सांगितले. परंतु शासन अशी निकृष्ट दर्जाची व कीड लागलेली डाळ देणारच नाही असे ठामपणे ग्राहकांनी सांगितले तसेच हा दुकानदारच फसवेगिरी करुन शासनाकडून आलेली चांगली डाळ बदलून ग्राहकांना निकृष्ट दर्जाची डाळ देत असल्याचे सांगितले. याआधीही महालक्ष्मी ग्रेन स्टोअर्स या शिधावाटप दुकानातून शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट दर्जाचे गहू देण्यात आले होते व आमदार मिहीर कोटेचा यांनीच हे प्रकरण जनतेसमोर आणले होते, असे येथे जमलेल्या नागरिकांनी सांगितले. नेहमीच या शिधावाटप दुकानातून नागरिकांना निकृष्ट दर्जाचे धान्य दिले जात असून शासनाने व रेशनिंग अधिकाऱ्यांनी या शिधावाटप दुकानावर कडक कारवाई करुन महालक्ष्मी ग्रेन स्टो अर्सकडून शिधावाटप केंद्र काढून घेण्यात यावे, अशी मागणी संतप्त नागरिकांनी यानिमित्ताने केली आहे.
रिपोर्टर