' नाते शब्दांचे ' ई प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचा आँनलाईन प्रकाशन सोहळा संपन्न.
- by Reporter
- Jun 19, 2020
- 964 views
मुंबई (भारत कवितके) : नाते शब्दांचे' साहित्य मंच कोपरगांव संपादक शिंदे व सहसंपादक पंडित निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील निवडक ५० कवि,कवयित्रीच्या कविताचा समावेश असलेला ' नाते शब्दांचे 'या 'ई ' प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचाप्रकाशन सोहळा गुरूवार १८ जून रोजी रात्री ८ वाजता आँनलाईन पार पडला.विविध भाव भावनाच्या छटा असलेला,विविध विषयाच्या,आशयाच्या कविताचा यात समावेश असल्याचे आढळून आले.
' आपल्या सर्वांच्या कवितांची एकत्र बांधणी करून ती आठवण होऊन साठवण राहावी,या उदात्त हेतूने आपण हा 'ई' काव्यसंग्रह काढीत असल्याचे शिंदे यांनी मनोगतात सांगितले.
' पाहणे तुझे..','बाप माझा शेतकरी होता ','बऴी ','लेक चालली सासरला ', ' आई ' 'मन','कोण झालो',अस्तित्व', 'पर्यावरणाची कास ',' जय जय महाराष्ट्र माझा ',' मायेची महती ','अभंग ' ' ये ना ', 'माझी दुनिया ','श्वेत वस्त्रातील रागिणी,' माझी सखी ',पाऊस,' 'माझी विठू माऊली ', ' नदी किनारा ','पंढरीची वारी ',' कोरोना,' ' सावराया हवे आता ',प्रवाह','बधिर मन ','कळी नको तोडू'वगैरे वगैरे भरगच्च,वाचनीय,रंगीतमय,कवितांचा या काव्यसंग्रहात समावेश झालेला आहे
रिपोर्टर