अविनाश ध. सकुंडे " आंतरराष्ट्रीय शांतता दूत " पुरस्काराचे मानकरी 

मुंबई(शांत्ताराम गुडेकर) : भारतीय महाक्रांती सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष ,संपादक -शिववृत,जनसंपर्क अधिकारी (Human Rights )महाराष्ट्र, आँल इंडिया अँटी करप्शन कमिशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश ध.सकुंडे यांना इंटरनॅशनल ह्युमन राईट् मिशनतर्फे आंतरराष्ट्रीय " शांतता दूत" (International Peace Ambassador) या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.सकुंडे यांच्यातर्फे  गेल्या २० वर्षे पासून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे तसेच स्वयंम रोजगार कर्ज मार्गदर्शन शिबिरे , अनेक गोरगरीब व गरजु नागरीकांना विविध शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच शेतकरी बांधवाना कर्ज मिळवून देणे तसेच अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आत्महत्या पासून परावृत्त करणे असे उपक्रम राबविण्यात आले आहे  तसेच संपूर्ण भारतात भारतीय महाक्रांती सेनेच्या माध्यमातून  कार्यकर्त्यांचे जाळे उभे करून समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलने व उपोषण केले तसेच जागतिक पातळीवर अनेक भूकबळी तसेच दहशतवाद महिला अत्याचार या गंभीर प्रश्नांवर निर्भडपणे मत व्यक्त करीत न्याय मिळवून दिला या कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.अविनाश ध. सकुंडे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भा.म.सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड. आनंद गुगळे , वकिल आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अँड. संजीव जाधव पाटील ,महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष योगेश भाऊ घोडके विदर्भ प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ ताकोते पाटील विद्यार्थी आघाडी विदर्भ कार्याध्यक्ष ऋषिकेश वाकडे पाटील भारतीय महाक्रांती चित्रपट सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मनाथ जी राणे भारतीय मा क्रांती सेनेचे मुंबई जिल्हाध्यक्ष सुलेमान भाई  मुस्लिम आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बग्गा भाई पठाण नाशिकचे जिल्हाध्यक्ष समीर भाऊ भडांगे नागपूर जिल्हा अध्यक्ष धर्मराज भाऊ आदमने  यांच्यासह अनेक सामाजिक संस्था,पत्रकार,वृत्तपत्रलेखक आणि मित्रपरिवारतर्फे अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

संबंधित पोस्ट