ब्राइट फ्युचर" संस्थेचा कोरोनाच्या संकट काळात हजारो गरजूंना मदतीचा हात

मुंबई (शांताराम गुडेकर) : ब्राईट फ्यूचर ही संस्था गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत आहे. जी मुले १३ ते २५ या वय गटातील आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. जी मुले शाळा व कॉलेज बाह्य आहेत. अशा मुलांना कौशल्य विकास हा कोर्स दिला जातो. तसेच १८ ते २५ वयो गटातील मुलांना रोजगार मिळवून दिला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांकडून कोणतीही फी न घेता हे सर्व मोफत केले जाते. हे सर्व करत असताना ब्राईट फ्युचर संस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर पालवे यांनी कोरोनाच्या या संकट काळात मिशन राहत या कार्यक्रमाच्या अंत्तर्गत लॉकडाऊन झाल्यापासून ते आत्तापर्यंत गरीब - गरजू आणि विधवा महिला, रिक्षा ड्रायव्हर, वेश्यां व्यवसाय करणाऱ्या महिला तसेच तृतीयपंथी मजदुर अशा १९  हजार लोकांना रेशन (धान्य) वाटप केले गेले आहे. कुर्ला, भांडुप, मानखुर्द, अंबरनाथ, नालासोपारा, बांद्रा, वरळी आणि चेंबूर याठिकाणी या संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत. त्याचबरोबर अजून १० हजार लोकांपर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न सुद्धा चालू आहे. हे काम पूर्ण मुंबई उपनगर मुंबईमध्ये चालू आहे.

संबंधित पोस्ट