कोरोना मुक्तीसाठी चांदीवली बचाओ अभियान प्रभागाची जबाबदारी नगरसेवकांकडे देऊन राजकीय कार्यकर्त्यांना द्यावे प्रशिक्षण
- by Adarsh Maharashtra
- Jun 17, 2020
- 262 views
मुंबई (शांताराम गुडेकर) मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढते आहे तर दुसरीकडे रुग्णांना बेड मिळणे देखील अवघड झाले आहे. मुंबईत लॉकडाऊन कायम असला तरी अनेक ठिकाणी शिथिलता आणलेली दिसत आहे. नागरिक मोठं मोठ्या संख्येने कामानिमित्त बाहेर पडत आहेत. मुंबईची परिस्थिती अशीच राहिली तर कोरोनाला रोखणे कठीण होणार आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी चांदीवलीतील समाजसेवक साई श्रद्धा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष शुभ्रंशु दिक्षित यांनी मुंबई उपनगरातील चांदीवली विभाग कोरोना मुक्तीसाठी चांदीवली बचाओ अभियान सुरू केले आहे. याकरिता दीक्षित यांनी स्थानिक आमदार , नगरसेवक , समाजसेवक , कार्यकर्ते यांच्या भेटी घेऊन निवेदने देत या अभियानात उतरण्याचे आवाहन केले आहे. चांदीवली परिसर कोरोना मुक्तीसाठी समिती गठन करण्याची मागणी दीक्षित यांनी आमदार दिलीप लांडे यांच्याकडे केली आहे. प्रत्येक प्रभागाची जबाबदारी नगरसेवक यांच्याकडे सोपवून सर्व राजकीय कार्यकर्त्यांना या अभियानातुन प्रशिक्षण दिले तर चांदीवली कोरोना मुक्त व्हायला वेळ लागणार नाही असे समाजसेवक शुभ्रंशु दीक्षित यांनी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम