कांदिवली मध्ये ' भारतीय जैन संघटना ' व्दारा आरोग्य शिबिर संपन्न.
- by Adarsh Maharashtra
- Jun 17, 2020
- 579 views
मुंबई:(भारत कवितके) कांदिवली मधील गांधीनगर,के.डी.कंपाउंड,श्रीसिध्दीविनायक सहकारी ग्रहनिर्माण संस्था(एस.आर.ए.) कार्यालयात भारतीय जैन संघटना व्दारा बुधवार दिनांक 17 जून 2020 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत आरेग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव काळात तोंडाला मास्क वापरून,सोशल डिस्टन्स ठेऊन सेनिटाजरने हात साफ करून के.डी.कंपाउंड गांधीनगर विभागातील नागरिकांसाठी पल्स आँक्सीमिटर ,गन मिटर च्या साहाय्याने प्राथमिक स्वरूपाची आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळी आवश्यकतेनुसार गरजेनुसार डाँक्टरांनी रूग्णंना औषध,गोळ्या दिल्या.भारतीय जैन संघटनेच्या डाँ.उमेश गायकवाड,डाँ.राजेश मेहता यांनी या आरोग्य शिबिरात विभागातील एकूण 173 पुरूष,स्त्री रूग्णांची वैद्यकीय तपासणी केली, तसेच पूर्वीचे इतर कोणते आजार आहेत का ? या बाबत रूग्णांना उपराचा दरम्यान विचारणा केली.या प्रसंगी भारत कवितके,प्रभात पाल,मंगेश पांडे यांनी आरोग्य शिबिरासाठी डाँक्टरना मदत केली.आरोग्य शिबिरास विभागातील नागरिकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याचे डाँक्टरनी सांगितले श्रीसिध्दीविनायक सहकारी ग्रहनिर्माण संस्थाचे अध्यक्ष विजय पालजी,महासचिव भारत कवितके,खजिनदार हिंदूराव मोरे,व संस्थेचे इतर पदाधिकारी,सभासद आरोग्य शिबिर प्रसंगी उपस्थित होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम