
कलाकार चेतन राऊत यांनी आपल्या कलाकृतीद्वारे आदित्य ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- by Reporter
- Jun 15, 2020
- 707 views
मुलुंड : (शेखर चंद्रकांत भोसले): भांडूप येथील एका हरहुन्नरी कलाकाराने आपल्या कलाकृतीतून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री माननीय आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनी त्यांना वाढदिवसाच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या असून या कलाकृतीचे परिसरातील कला रसिकांनी कौतुक केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कोणीही मातोश्रीला न येता तुम्ही जिथे असाल, तिथूनच मला आशीर्वाद व शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले होते, त्याला अनुसरून त्यांच्या या निर्णयाला मान देवून भांडूप येथील कलाकार चेतन राऊत यांनी ६ रंगछटा असलेल्या ४००० पुश पिनचा वापर करून अवघ्या ६ तासाच्या कालावधीत राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे २४ इंच x १८ इंच आकारमानाचे पोर्ट्रेट साकारले व या कलाकृतीद्वारे आदित्य ठाकरेंना आगळ्या वेगळ्या कलात्मक शुभेच्छा दिल्या. कलाकार चेतन राऊत यांच्या या कलाकृतीचे भांडूप परिसरात कौतुक होत असून परिसरातील शिवसैनिक सोशल डिस्टेन्स राखत त्यांची ही कला बघून दाद देताना दिसत होते.
रिपोर्टर