आणि मुंबई एकी समुह यांच्या साहाय्याने गरजू कलावंतांना मदतीचा हात...!

मुंबई (प्रतिनिधी ): कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक सेवाभावी संस्थेने मुंबई महाराष्ट्रातील गरजू जनतेसाठी मदत कार्य सुरू केले आहे ही कौतुकाची बाब आहे. 
याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सभासद तसेच मुंबई एकी समुह मधील कलाकार, तंत्रज्ञ व इतर विभागातील काही गरजू कलावंत यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आणि मुंबई एकी समुह यांच्या साहाय्याने जीवनावश्यक वस्तूंचं कीट आणि अर्सेनिक ३० होमिओपॅथी गोळ्यांचं वाटप  करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते तसेच मुंबई एकी समुहचे सर्वश्री मनिष मेहेर, अभिलेष सरपडवळ, महेश्वर तेटांबे, राजू झेंडे उपस्थित होते. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विजय पाटकर, अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेत्री नूतन जयंत, दिग्दर्शक दिपक कदम, विजय राणे, शिरीष राणे, राज सुर्वे, अमर गवळी, पत्रकार नंदकुमार पाटील, हरी पाटणकर या दिग्गजांनी देखील गरजू कलावंतासाठी आपला मदतीचा हात सरसावला आहे. .या संकटमय काळात गणेश तळेकर, शिवाजी रेडेकर, दिपक सावंत, सिद्धी कामथ, पल्लवी पाटील, अमोल भावे, किरण कुडाळकर, राजेंद्र सावंत, शिल्पा सावंत, अमिता कदम, शितल खालापूरे, डॉ सुहास राणे, अनंत मेस्त्री, सुरेश डाळे, आर्यन देसाई, सचिन गायकवाड, विशाल सावंत, सचिन पाताडे आदी मान्यवर कोविड योद्धा यांनी देखील गरजू कलावंतांना साभार मदत उपलब्ध करुन देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.


संबंधित पोस्ट