
अंबरनाथ नगर पालिकेत अत्याधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून कोविड १९ ची चाचणी केवळ दोन मिनीटात करण्याचा प्रस्ताव-सुनिल चौधरी.
- by Rameshwar Gawai
- Jun 11, 2020
- 915 views
अंबरनाथ / प्रतिनिधी : अंबरनाथ येथे नाशिकच्या ईएमडीएस सॉफ्टवेर प्रा.लि कंपनीचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून निर्माण केलेले कोविड१९
टेस्टचे मशीन लवकरच उपलब्ध करुन द्यावे .या टेस्टची किंमत केवळ एका व्यक्तीस सहाशे रूपये असून तो खर्च सुध्दा पालिका प्रशासनाने करावा त्यामुळे रुग्णाना मोठ्या दिलासा मिळणार आहे. रुग्णाना ताबडतोब निदान समजल्यावर तातडीने औषधोपचार घेता येणार आहे. मार्गदर्शक खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर यानी त्वरित कार्यवहीचे आदेश द्यावेत अशी विनती माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केली. यावेळी डॉ गणेश राठोड हे सुध्दा उपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम