कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची परवड थांबेना! महापालिका रुग्णालयांविरोधात ताबडतोब कारवाई करा!

कोरोनाबाधित मृतांच्या नातेवाईकांसह भाजप उपाध्यक्ष किरीट सोमैया उद्या राज्यपालांची भेट घेणार

मुंबई :मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची परवड ही कोरोना बाधितांच्या मृत्यूनंतरही थांबताना दिसत नाही. गेल्या आठवड्यात ८० वर्षीय विठ्ठल मुळ्ये यांचे शताब्दी रुग्णालयातून गायब होणे आणि नंतर त्यांचा मृतदेह बोरीवली स्थानकाच्या रुळांवर सापडणं याच पार्श्वभूमीवर नातेवाईकांमध्ये रुग्णालय प्रशासनाविरोधात प्रचंड संताप आहे. आज त्यांच्या नातेवाईकांसह, भाजप उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी मालाड येथील कुरार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. रुग्णालय प्रशासनाविरोधात कडक कारवाई आणि चौकशीची मागणी केली.

मुंबईत गेल्या काही दिवसांत मृतदेह गायब होणे, अशा डझनहून अधिक केसेस उघडकीस आल्या आहेत. उद्या या सर्व नातेवाईकांसह सोमैया राज्यपालांची भेट घेण्यात येणार आहे.मुंबईकर कोरोनाचा संसर्ग आणि त्यानंतर घरातील व्यक्तीचा मृत्यू होणे यामुळे धास्तावले आहेत. त्यात वारंवार हे प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही ठाकरे सरकार आणि महापालिका प्रशासन कुठेच कारवाई करताना दिसत नाही. रुग्णालय प्रशानाविरोधात आता पोलीस स्थानकांत नातेवाईक तक्रार करत आहे, अशा घटना सध्या वाढू लागल्यामुळेच उद्या थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सोमैया करणार आहेत.


                                                        

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट