
कोरोनाग्रस्त महिलेने दिला सुदृढ बाळाला जन्म... वोक्हार्ट रूग्णालयात सिझेरियन प्रसूती यशस्वी
- by Reporter
- Jun 11, 2020
- 1153 views
(मुंबई प्रतिनिधी): (मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रसारप्रकर्षाने वाढतोय. गरोदर महिलांना या विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता सर्वांधिक आहे. असे असताना ठाणे जिल्ह्यातील एका कोरोना पॉझिटिव्ह मातेने एका निगेटिव्ह बाळाला जन्म दिला आहे. या मातेनं एका गोंडस मुलीला जन्म दिलायं. मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात या महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे या महिलेच्या गर्भातील बाळाला कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नसूनबाळं सुदृढ जन्माला आले आहे.) राशी खन्ना (नाव बदललेलं) असे या महिलेचं नावअसून त्या २७ वर्षीच्या आहेत. गर्भवती असल्याने घरी नवीन पाहुण्याची चाहुल लागल्याने कुटुंबियांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पण संसर्ग कंट्रोल प्रोटोकॉलनुसार, गर्भधारणेच्या ३९ आठवड्यांनंतर म्हणजेच १ मे रोजी या गर्भवती महिलेला कोविड-१९ चाचणी करण्यात आली. या चाचणी अहवालात महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निदान झाल्यानंसंपूर्ण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गर्भवतीमहिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याने २६ मे पासून तिला घरीच क्वारंटाईन करण्यात आलेहोते. मात्र, ३ जून च्या मध्यरात्री या महिलेच्या अंगावरून पांढरा स्त्राव जात असल्याने तिला कुटुंबियांनी मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात दाखल केलं. ही महिला रूग्णालयात येण्यापूर्वीच सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. कोविड-१९संसर्गजन्य रोगतज्ज्ञ आणि अन्य डॉक्टरांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पीपीई किटपरिधान केले होते. त्यानंतर या महिलेवर सिझेरियन प्रसूती करण्यात आली. याप्रसूतीनंतर महिलेनं एका गोंडस मुलीला जन्म दिलायं. मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातीलप्रसूतीशास्त्र सल्लागार आणि स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. मंगला पाटील, सहाय्य करणारेडॉ. ब्रिजेश दुबे, जनरल सर्जन डॉ. रूपा मेपाणी आणि नियोनाटोलॉजिस्ट डॉ. समीर शेखयांच्या चमूने ही सिझेरियन प्रसूती यशस्वी केली आहे. याबाबत माहिती देताना मीरारोड येथील वोक्हार्टरूग्णालयातील प्रसूतीशास्त्र सल्लागार आणि स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. मंगला पाटीलयांनी सांगितले की, ‘‘या महिलेचे पहिलेचं बाळंतपण होते. कोरोना पॉझिटीव्ह ही असल्याने इतरांनासंसर्ग होऊ नये, यासाठी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पीपीई किट परिधान करून तिचीतपासणी केली. त्यानंतर तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन सिझेरियन द्वारे प्रसूतीकरण्यात आली. आई आणि बाळामध्ये कोणताही संपर्क होणार नाही, याची काळजी डॉक्टरांच्या टिमने घेतली होती. डॉ. पाटील पुढे म्हणाल्या की, ‘‘या महिलेला मुलगी झाली असून दोघांचीहीप्रकृती उत्तम आहे. मुलीचे वजन ३.६ किलो इतके आहे. बाळाला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत तरी त्याला प्रसूतीनंतर लगेचच निगराणीखाली ठेवण्यात आले होते.त्यानंतर २४ तासांनी या बाळाची कोरोना चाचणी करण्यात आली. पण सुदैवाने हा चाचणीअहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या आणखीन ७ दिवस दोघांनाही डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर मातेची कोरोना चाचणी करण्यात येईल. ही चाचणी निगेटिव्हआल्यावरच आई व बाळाला घरी सोडण्याचा निर्णय घे महिलेची पती राहिल खन्ना (नाव बदललेलं) म्हणाले की, ‘‘पत्नीगर्भवती आणि त्यातही कोरोना पॉझिटीव्ह असल्याने चिंता लागून राहिली होती. घरच्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले होते. घरातील सर्वाची कोरोना चाचणी करण्यात आली. पण ही चाचणी निगेटिव्ह आहे. मात्र, त्यानंतर पत्नीला त्रास होऊ लागल्याने तिलारूग्णालयात हलवण्यात आले. माझ्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. डॉक्टरांच्याप्रयत्नांमुळे मुलीला संसर्ग झालेला नाही. पण मी अजूनही बाळाला आणि पत्नीला भेटूशकलो नाही. परंतु, आम्ही व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात आहोत. अशा अवघड परिस्थितीतडॉक्टरांनी माझ्या पत्नी व बाळाचे प्राण वाचवले आहे, त्यांचे आभार मानतो.
रिपोर्टर