अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान संंस्थेचा "एक हात मदतीचा" अभिनव उपक्रम...

(मुंबई प्रतिनिधी): अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान संस्था गेली ११ वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत काम करीत आहे तसेच नैसर्गिक आपत्तीतही अक्षरा संस्थेकडून मागील वर्षी अनेक गरजू लोकांना सांगली कोल्हापूर येथे मदत करण्यात आली होती.
संस्थेमार्फत मागील ११ वर्षांत शैक्षणिक उपक्रमांतर्गत १७ हजार मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
अक्षरा संस्थेस महाराष्ट्र शासन, Reliance Foundation, मानवता हॉस्पिटल (नाशिक) व इतर अनेक नामवंत संस्था तसेच शाळा व मंडळांनी पुरस्कृत केले आहे.
आता आलेल्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत  संस्थेने या समाजकार्यात खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे  अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान च्या माध्यमातून दिनांक १७ मार्च २०२० पासून आज पर्यंत लॉकडाऊन मध्ये
 मुंबईतील रे रोड पूर्व  व शिवडी येथील  रोजंदारीवर काम करणाऱ्या २००  गरजू  कुटुंबाना Arsenicum album 30C या गोळ्यांचे वाटप* करण्यात आले. 

तसेच  लॉकडाऊन च्या या कठीण परिस्थितीत आरे कॉलनी, वसई व नवी मुंबईतील खारघर, मुंबईतील रे रोड शिवडी येथील एकूण १६५ गरजू कुटुंबांना रोजच्या जीवनात आवश्यक असलेल्या किराणा सामानाचे वाटप* करण्यात आले.  
     
 या सामनामध्ये एक महिना  पुरेल इतक्या वस्तूंचा समावेश आहे-
 (५ किलो तांदूळ + ५ किलो गहू पीठ + १ किलो डाळ + १ लिटर तेल + १ किलो मीठ + १किलो साखर + १/२ किलो चहा powder + २ आंघोळीचे साबण + २ कपडे धुण्याचे साबण + १ किलो बटाटे + १ किलो कांदे) एकूण किंमत रुपये ७५०/-

लॉकडाऊन चा अवधी वाढल्या मुळे संस्थे मार्फत ज्या विभागांमध्ये मदत केली आहे अशा विभागातील कामगार वस्तीतून अधिक गरजू लोकांनी मदतीसाठी संपर्क साधला आहे त्यामुळे संस्थेने अजून २०० गरजू कुटुंबांना मदत करण्याचा संकल्प केला आहे.

     समाजहीताचे कार्य अखंडपणे सुरू राहण्यासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. लाॅकडाउनच्या या परिस्थितीमध्ये आपणही  अशाप्रकारचे सहकार्य आमच्या संस्थेला करू शकता. तुम्ही केलेली मदत थेट गरजुंपर्यंत पोहोचविण्यात येईल.

संबंधित पोस्ट