देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर शिवीगाळ करणाऱ्यांविरुद्ध मोहित भारतीय यांनी केली पोलीस ठाण्यात तक्रार
- by Adarsh Maharashtra
- Jun 10, 2020
- 1529 views
मुंबईः राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामकारक मजकूर आणि अपशब्द वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी लेखी तक्रार मुंबई भाजपाचे सरचिटणीस मोहित भारतीय यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात केली असून संबंधितांवर अटकेची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन काही भाडोत्री लोकांकडून प्रतिष्ठित व्यक्तीविरूद्ध शिवीगाळ, अपमानास्पद भाषा वापरून बदनामी केली जाते. अशा वाईट प्रवृत्तीना आळा व्हावा यासाठी कठोर कारवाई केली जावी.अशी मागणी भारतीय यांनी तक्रारीतून केली आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर शिवीगाळ आणि बदनामी करण्याचे षडयंत्र काही व्यक्तींकडून सुरु होते. पोलिसांनी यासंदर्भात तक्रार दाखल करून घेतली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम