कर्जत तालुका कोरोनामुक्तीचा उंबरठ्यावर!
नेरळचा “तो” कोरोनाग्रस्त कोरोना निगेटीव्ह! घरी राहा, सुरक्षित राहण्याचे आवाहन!
- by Adarsh Maharashtra
- Apr 29, 2020
- 2145 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील नेरळ येथे राहणाऱ्या एका ४० वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने नेरळ शहरात प्रंचड खळबळ माजली होती. त्यामुळे तो रुग्ण राहात असलेला परीसर कन्टेनमेंट झोन लागु करणेत आला आहे. तर “त्या” कोरोनाग्रस्ताचे कुटुंबिय कोरोना निगेटीव्ह असल्साचे चाचणीत स्पष्ट झाले आहे. असे असतानाच आज नेरळचा “त्या” कोरोनाग्रस्ताची कोरोनाची सलग दुसरी चाचणी निगेटीव्ह आल्याची माहीती नुकताच कर्जत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडुन समजली आहे. त्यामुळ नेरळकरांना दिलासा मिळाला असुन कर्जत तालुका कोरोनामुक्तीचा उंबरठ्यावर असल्याचे बोलले जात आहे. तरीही आणखी काही दिवस नागरिकांनी घरीच राहुन सुरक्षित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याकडे सुरक्षित तालुका म्हणुन पाहीले जाते. या तालुक्यांतील प्रशासनाने येथे कोरोना पादुर्भाव वाढू नये याकरता प्रंचड मेहनत घेतली आहे. येथे जिल्हा सिमाबंदी कडक करण्यात आली आहे. असे असतानाच ठाणे येथे एका फार्मा कंपनीत काम करणारा ४० वर्षीय तरुण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर नेरळ शहारासह कर्जत तालुक्यांत प्रंचड खळबळ माजली होती. त्यानंतर या कोरोना बाधितांचा संपर्कात आलेल्या अनेकांचा कोरोना टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यामधे या तरुणाचे कुटुंब आणि त्याचा मित्र यांच्या कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत. त्यामुळे नेरळकरांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र आज या कोरोना पाॅझिटीव्ह तरुणाची कोरोनाची दुसरी चाचणी करण्यात आली. त्यामधे हा तरुण निगेटीव्ह असल्याची माहीती आज कर्जतचे तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. मोरे यांच्याकडुन समजली.
विशेष म्हणजे नेरळ शहरातील हा तरुण कोरोना पाॅझिटीव्ह आल्याने येथिल ग्रामपंचायत प्रशासनाने नेरळ शहर कडकडीत बंद ठेवले होते. येथिल जनतेचा मनांतील प्रंचड भितीचे सावट पसरले आहे. मात्र या नेरळ शहरात सापडलेल्या तरुणाचे कुटुंब जर कोरोना पाॅझीटीव्ह आले असत तर मात्र नेरळ शहरावर फार मोठे संकट येणेची शक्यता नाकरता येत नव्हती. मात्र नेरळ शहरातील नागरिकांनी घरातच बसणे पसंत केल्याने आता नेरळ शहरात सध्या कोरोनाचा नवीन रुग्ण नसल्याचे दिसत आहे. त्यामुळ नागरिकांनी आणखी काही दिवस संयम पाळत घरातच बसावे, आणि सुरक्षित राहावे असा सल्ला प्रशासन देत आहे. कोरोनाचे संकट आपल्या दारावर आले असतानाही नेरळकरांनी त्याला घरात बसुन हे संकट पळवून लावले आहे. तरीही आणखी काही दिवस घरातच बसा आणि सुरक्षित राहा असे आवाहन प्रशासनाचा वतीने करण्यात येत आहे.
दरम्यान कर्जत तालुक्यांतील प्रशासनाने कर्जत तालुक्यांतील कोरोना प्रादुर्भाव रोखला जावा यासाठी अनेक उपाययोजना केली आहे. तसेच नेरळ आणि कर्जत पोलिसांनी कर्जत तालुक्यातील जिल्ह्यांच्या सिमा पॅक केल्याने बाहेरुन कोरोना येथे येणे अशक्य बाब बनली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा बजावणेस बाहेर जाणाऱ्यांनी आपल्या कुटुबांची आणि परीसराचा दक्षता घ्यावी, तसेच जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांनी तेथेच राहावे अशी मागणी करणेत येत आहे. नेरळ शहारातील अनेकांचा कोरोना टेस्ट निगेटीन्ह आल्या असल्याने येथे दिलासा मिळाला असतानाच आज “त्या” कोरोनाची लागण झालेल्या तरुणाची कोरोनाची सलग दुसरी चाचणी निगेटीव्ह आल्याने आता नेरळसह संपुर्ण कर्जत तालुका कोरोनामुक्तीचा उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरु आहे.
कर्जत तालुक्यांतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे, कर्जतचा उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली परदेशी, कर्जतचे तहसिलदार विक्रम देशमुख, कर्जतचे पोलिस उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर, नेरळचे सहाय्य पोलिस निरीक्षक अविनाश पाटील, कर्जतचे पोलिस निरीक्षक अरुण भोर, कर्जतचा नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, नेरळचे सरपंच रावजी शिंगवा यासंह अनेक जण प्रयत्न करीत असल्याचे दिसते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम