श्री गणेश संस्थानचा १ लाख रुपयांचा धनादेश महापौरांकडे सुपूर्द

मुंबई (प्रतिनिधी): घाटकोपर पूर्वेकडील श्री गणेश संस्थान कडून (गणेश मंदिर) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड -१९ साठी १ लाख रुपयांचा धनादेश संस्थानाचे अध्यक्ष विजय राणे, चिटणीस विलास मयेकर, पदाधिकारी आणि विश्वस्तांच्या वतीने माझ्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. हा धनादेश  मी माननीय महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत मी महापौरांसोबत चर्चा केली. कोरोनाबाधितांना सहकार्य करण्यासाठी श्रीगणेश संस्थानने पुढाकार घेतल्याबद्दल महापौरांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत.

संबंधित पोस्ट