कर्जतचा आमदारांचा मोटारसायकल वरुन पाहाणी दौरा! आमदार थोरवे यांचा धडपडीने नुकसानग्रस्तही हेलावले!

आमदार कसा असावा याचीच सर्वत्र चर्चा!

कर्जत. (धर्मानंद गायकवाड):-   रायगड जिल्ह्यातील कर्जत मतदार संघात निसर्ग चक्रीवादळाने हाहाःकार माजविला. या चक्रीवादळाने येथे अनेकांना उध्वस्त केले आहे. येथे कोणाची घरे उध्वस्त झाली, तर कोणाची फळबागे व शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्जत मतदार संघात या चक्रीवादळाने नागरीकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्तांना मदत मिळावी याकरता कर्जतचे आमदार महेद्रशेठ थोरवे यांनी थेट काही वाड्या पाड्यात मोटारसायकल वरुन या नुकसानग्रस्त भागांचा पाहाणी दौरा केला आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त भागातील मंडळीही आमदारांनी ही धडपड पाहुन अक्षरशा हेलावले आहेत. आमदार कसा असावा याचीच चर्चा आज कर्जत शहरात सर्वत्र सुरु होती. मोटार सायकल वरुन प्रथमच कोणी आमदार या नुकसानग्रस्ता पर्यंत पोहोचल्याने या नुकसान ग्रस्तांनाही दिलासा मिळाला आहे. 


रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्री वादळामुळे महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला सर्वाधिक तडाखा बसला आहे. यातच रायगड जिल्ह्यातील कर्जत व खालापुर तालुक्यांतील बऱ्याच गावांना याचा फटका बसुन प्रंचड नुकसान झाले आहे. कर्जत मतदार संघातील झालेल्या खालापुर  तालुक्यातील उंबरखेड येथे तर या चक्रीवादळाने अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवुन तेथील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. त्यामुळे या नुकसान ग्रस्त भागाची कर्जतचे तरुण तडफदार  आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी आज पाहणी करुन नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्याचे आश्वासन आमदार थोरवे यांनी नुकसान ग्रस्तांना दिले आहे. तसे पत्रही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना कर्जतचे आमदार थोरवे यांनी पाठविले आसल्याचे सांगणेत येत आहे.
दरम्यान रायगडसह 3 जुन रोजी झालेल्या निसर्ग चक्री वादळाने संपूर्ण रायगड जिल्ह्यात जनजीवन विस्कळित केले आसतानाच कर्जत मतदार संघात लोकांच्या फळबागा आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, खालापूर तालुक्यातही चक्री वादळाने नगदी पिकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या या नुकसानीची पाहणी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी केली आहे. यावेळी त्यांचा समवेत कर्जतचे काही सेनेचे प्रमुख पदाधिकारी, तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य मोतीराम ठोंबरे आणि तालुका कृषी अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी उपस्थिती होते. यावेळी मात्र कर्जत विधानसभा मतदार संघात जेथे वाहन जात नाही अशा वाड्या पाड्या ठिकाणी कर्जतचे आमदारांनी मोटारसायकल वरुन हा पाहाणी दौरा केला आहे. त्यामुळे कर्जतचे आमदार थोरवे यांचा सर्वांना हेवा वाटत आहे. कर्जत मतदार संघाचे आमदार यांनी स्वता मोटारसायकल चालवीत केलेल्या दौऱ्याने सामान्यांचा आमदार अद्यापही सामान्यच असल्याने, आमदार कसा असावा याचीच चर्चा कर्जत मतदार संघात सुरु आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट