मुलुंड पूर्व मधील टाटा कॉलनीत वाढला डुक्करांचा वावर

मुलुंड :( शेखर चंद्रकांत भोसले) टाटा कॉलनीतील शेवटची बिल्डिंग, इमारत क्र १२ च्या पूढे आणि स्मशानभुमीच्या मध्ये खाडीचा भाग येतो. या खाडीत टाकले जात असलेल्या डेब्रिजमुळे व इतर कचऱ्यामुळे येथील  कांदळवने संकटात आली असून ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी या 

कांदळवनात आपल्या उपजिविकेसाठी वावरणारी रानटी डुक्कर टाटा कॉलनीतील स्मशानभूमीच्या रस्त्यावर येत आहेत. टाटा कॉलनीतील मोकळ्या मैदानात गेल्या २ महिन्यांपासून अनधिकृतपणे भाजी विकण्याचा धंदा करीत असलेला भाजीविक्रेता त्याच्याकडील शिल्लक राहिलेला भाज्यांचा कचरा पालापाचोळा  इमारत क्र १२ च्या पुढील मोकळ्या जागेत टाकत असल्यामुळे हा भाज्यांचा कचरा, हिरवा पालापाचोळा खाण्यासाठी व आपल्या उपजीविकेसाठी हे रानटी डुक्कर टाटा कॉलनीत येत असल्यामुळे त्यांच्या वावरण्याने परिसर अस्वच्छ झाला असून सर्वत्र घाण व दुर्गंधी पसरली आहे.  

टाटा कॉलनीतील स्मशानभूमीच्या रस्त्यावर माणसांची वर्दळ कमी असते याचा फायदा घेवून समाजकंटक रस्त्याच्या दुतर्फा जेथे खाडीतील कांदळवने आहेत तेथे सिमेंट कॉंक्रीटचे डेब्रिज, रस्त्यावरून काढलेले पेव्हर ब्लॉक्स, भाज्यांचा कचरा व इतर कचरा टाकतात. येथे पडणाऱ्या डेब्रिजमुळे व इतर कचऱ्यामुळे येथील कांदळवने नष्ट होत आहेत. त्यामुळे या कांदळवनात वावरणारे व आपली उपजीविका करणारे रानटी डुक्कर काही खायचे मिळेल या आशेने टाटा कॉलनीतील स्मशानभूमी रस्त्यावर व बिल्डिंग नंबर १२ च्या बाजूला वावरताना दिसत आहे. टाटा कॉलनीतील पूर्वरंग बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात सध्या भाजीचे टेम्पो लागत असून या भाजीच्या टेम्पोतील बाकी राहिलेला माल, भाज्यांचा कचरा स्मशानभूमीच्या मार्गावर बिल्डिंग नंबर १२ च्या पुढे भाजी विक्रेता नेवून टाकत आहेत. हा कचरा खाण्यासाठी व उपजीविकेसाठी कांदळवनातील डुक्कर येथे टाटा कॉलनी परिसरात येत आहेत त्यामुळे संपूर्ण परिसर अस्वच्छ होत आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने भाजीविक्रेत्यांना भाजी विकण्यास मनाई केलेली असतानाही छुप्या पद्धतीने टाटा कॉलनीतील राजपथ इमारतीत राहणारा भाजी विक्रेता इमारती समोरील मोकळ्या मैदानात भाजी विक्री करत असून या भाजी विक्रेत्याच्या अनेक तक्रारी पालिकेकडे व पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत परंतु पालिका आणि पोलिस येतात तेवढ्यापुरता हा भाजी विक्रेता भाजी विकणे बंद करुन पुन्हा भाजी लावत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. भाजी विकल्यानंतर भाजीचा कचरा बिल्डिंग नंबर १२ च्या पुढे नेवून टाकत असल्यामुळे हा कचरा खाण्यासाठी खाडीतील अनेक डुक्करे टाटा कॉलनी परिसरात येतात. पूर्वी स्वच्छ असलेली टाटा कॉलनी स्मशानभुमीच्या रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या डंपिंगमुळे व भाजी विक्रेत्याच्या भाजीच्या कचऱ्यामुळे आणि डुक्करांच्या वावरामुळे अस्वच्छ झाली असून सर्वत्र घाण व दुर्गंधी पसरली आहे. 

पालिकेच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात टाटा कॉलनी परिसरातील नागरिकांनी तक्रारी केल्या परंतु अद्याप काहीच कारवाई पालिकेकडून करण्यात आलेली नाही. येथील भाजी विक्रेत्याला भाजी विकणे बंद करुन त्यांच्यावर कडक कारवाई केली तर येथे पडणारा कचरा बंद होईल व त्यामुळे साहजिकच हा कचरा खाण्यासाठी येणारे डुक्कर येथे येणे बंद होईल तसेच कालांतराने टाटा कॉलनी परिसर पुन्हा स्वच्छ होईल त्यामुळे टाटा कॉलनीतील भाजी विक्रेत्यावर कडक कारवाई करण्यात यावी, आणि कांदळवनात डेब्रिज टाकणाऱ्या समाजकंटकांना अटकाव करावा,  अशी मागणी टाटा कॉलनीतील रहिवासी हेमंत पवार यांनी केली आहे.

पालिकेच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता काहीच प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला नाही. पालिका अधिकारी व स्थानिक नगरसेवकांनी येथे पडणारे डेब्रिज व नष्ट होणारी कांदळवने याबाबत गांभिर्याने विचार करणे जरूरीचे आहे तसेच मैदानातील भाजीविक्रेत्याला तात्काळ हटवून परिसर स्वच्छ ठेवला तर रानटी डुक्करांचा येथील वावर देखील बंद होईल अशी टाटा कॉलनीतील रहिवाशांनी एकजुटीने मागणी केली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट