पंढरपूर नगरपरिषद अलर्ट तर परराज्यातून आलेल्या वारकºयांना सहारा दिल्यास होणार कायदेशीर कारवाई

पंढरपूर : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध नियंत्रणासाठी आषाढी यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत शहरातील व ग्रामीण भागातील ४५० मठाधिपतींना नोटीसा काढल्यास याची माहिती उप मुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी दिली आहे.

आषाढी यात्रा सोहळा एक महिन्यांवर आला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहर व हद्द भागामध्ये असलेल्या सर्व लहान मोठे मठ, वारकºयांना भाडेतत्वावर देण्यात येणाºया खाजगी इमारती यांचा सर्वेक्षण केले आहे. सध्यास्थितीत त्या ठिकाणी वास्तव्यास असणारे नागरिक व साधकांची नावे संकलित करण्यात आली आहेत.

सर्व लहान मोठे मठांचे व्यवस्थापक, वारकºयांना भाडेतत्वावर देण्यात येणाºया इमारतींच्या मालकांना नोटीस देण्यात आली आहे. राज्यातील व जिल्ह्यातील, परराज्यातून येणाºया नागरिक साधकांना पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या पूर्व परवानगी शिवाय वास्तव्यास ठेवता येणार नाही. पूर्व परवानगीशिवाय नागरिक व साधकांना वास्तव्यास ठेवल्याचे निदर्शनास आल्यास आपल्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे पत्र उप मुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी दिली.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट