साहेब प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन व रिक्षाचालकांना अन्नधान्याच्या किटचे मोफत वाटप
- by Adarsh Maharashtra
- Jun 01, 2020
- 1933 views
मुलुंड : (शेखर चंद्रकांत भोसले) राज्यातील रक्तपेढिमध्ये निर्माण झालेल्या रक्त तुटवड्यामुळे इतर आजारांनी आजारी असलेल्या रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सामाजिक संस्थांना रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देवून मुलुंड येथील साहेब प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दि ३१ मे रोजी सकाळी ९ ते ५ यावेळेत करण्यात आले होते. जे.जे. रूग्णालय व नवजीवन रक्तपेढी यांच्या सहयोगाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संचारबंदी असतानासुद्धा सोशल मिडियावरील रक्तदानाची पोस्ट वाचून ब-याच रक्तदात्यांनी संपर्क करून आपली नावे नोंदवली होती. रक्तदान करण्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत मुलुंड मधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.
साहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय मशिलकर यांच्या पुढाकाराने सर्व जरूरी सुरक्षा घेत, सोशियल डिस्टेन्स ठेवत व आवश्यक उपाययोजना करुन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरस्थळी रक्तदात्यांचा ओघ वाढता होता व त्यामुळे १०० बाटल्या रक्त जमा करण्यात आले.
यावेळी रक्तदात्यांना प्रथम वाॅश बेसिन मध्ये हात स्वच्छ धुतल्यानंतरच प्रवेश देण्यात येत होता. रक्तदात्याचे नाव व माहिती नोंदवल्यानंतर त्यांचे हात सॅनिटायजरने साफ करून मास्क देण्यात आले. पुढे चहा-नाश्ता केल्यानंतर त्यांची रक्त चाचणी केली जात होती. नंतर रक्तदाब तपासून शिस्तबद्ध पद्धतीने सुरक्षित अंतर ठेवून रक्तदात्यांना बसण्याची सोय करण्यात आली होती. शिबिरात रक्तदात्यांची ने-आण करण्याकरिता निर्ज॔तुकीकरण केलेल्या २० गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
या रक्तदान शिबिराचे आयोजन संजय मशिलकर यांनी माजी उपविभागप्रमुख आनंद जाधव, जगदीश शेट्टी, विधानसभा संघटक नितीन सावंत तसेच शाखाप्रमूख चंद्रकांत शेलार, दिलीप वेदपाठक, सतिश बांदारकर, रमेश विरकर व इतर शिवसैनिकांच्या साथीने यशस्वीपणे केले. यावेळी संजय माळी यांनी चहा-नाश्ता व जेवणाची उत्कृष्ट सेवा दिली.
तसेच हातावर पोट असलेले रिक्षाचालक गेले २ महिने घरात बसून असल्यामुळे त्यांचे उत्पन्नाचे साधन बंद आहे. अश्या ३०० रिक्षाचालकांना आज साहेब प्रतिष्ठानच्या वतीने अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले तसेच पुढील रविवारी अश्याच प्रकारे दुसऱ्या ३०० रिक्षाचालकांना साहेब प्रतिष्ठानतर्फे मोफत अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष संजय मशीलकर यांनी यावेळी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम