कोरोनाच्या महामारीत विज बिलात सवलत द्या नगरसेवक आकाश पुरोहित

मुंबई :कोरोना सारख्या महामारीत लॉकडाऊन सुरू झाल्यापासून रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे.आर्थिक टंचाई निर्माण होवून कुटूंबाचे पालनपोषण करणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत विज देयके माफक किंवा सवलतीच्या दरात देण्यात यावी, अशी मागणी ‘सी’ व ‘डी’ प्रभाग समिती अध्यक्ष तथा (मुंबई शहर) जिल्हा नियोजन समिती सदस्य आकाश राज पुरोहित यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. रोजगार नसल्याने नागरीकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. केंद्र व राज्य शासनाकडून गरीब व बेरोजगार लोकांसाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या नागरीकांना दिलासा देण्यासाठी बेस्ट व खासगी विद्युत पुरवठा संस्थांनी मुंबई शहर व उपनगरातील वीज ग्राहकांना विज देयके माफक किंवा सवलतीच्या दरात देण्यात यावी, अशी मागणी पुरोहित यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट