राज्यात बरे झालेल्या रुग्णांचा विक्रमी उच्चांक एकाच दिवशी ८ हजार ३८१ रुग्णांना घरी सोडलेराज्यात कोरोनाच्या ३३ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरू

मुंबई, दि.२९:-कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधीक ७३५८ रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभरात २६ हजार ९९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २६८२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३३ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ३३ हजार ५५७ नमुन्यांपैकी ६२ हजार२२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ३५ हजार ४६७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार ९६७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११ दिवस होता तो आता १५.७ दिवस झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४३.३८ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे.राज्यात ११६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे:-ठाणे- ५८ (मुंबई ३८, ठाणे १, भिवंडी ३, नवी मुंबई ९, रायगड २, मीरा-भायंदर ३, पनवेल १, कल्याण डोंबिवली १), नाशिक- ३२ (जळगाव १७, नाशिक ३, मालेगाव ५, धुळे ७), पुणे- १६ (पुणे मनपा १३,सोलापूर ३), कोल्हापूर-३, औरंगाबाद- ५, अकोला- २ (अमरावती २) आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७७ पुरुष तर ३९ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४८  रुग्ण आहेत तर ५५  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या ११६ रुग्णांपैकी ७५ जणांमध्ये ( ६५ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २०९८ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४६ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे १६ मे ते २६ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७० मृत्यूंपैकी मुंबई १६, जळगाव- १४, नवी मुंबई -९, धुळे -६, मालेगाव -५ , औरंगाबाद ३, भिवंडी-३, नाशिक -३ , अमरावती -२ , कोल्हापूर -२, मीरा भाईंदर -२ , रायगड -२ , सोलापूर -२ आणि १ मृत्यू ठाणे येथील आहे.

एकूण:-बाधीत रुग्ण-(६२,२२८), बरे झालेले रुग्ण- (२६.९९७), मृत्यू- (२०९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टीव्ह रुग्ण-(३३,१२४)

मान्सून उंबरठयावर उभा आहे, हे लक्षात घेता येणा-या काळात कोरोना शिवाय इतर साथरोग देखील वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने पूर्वतयारी सुरु आहे. हिवतापासाठी संवेदनशील जिल्ह्यांमध्ये कीटकनाशक फवारणीचे नियोजन करण्यात आले आहे तर पाणी गुणवत्तेसाठी राज्यात स्वच्छता सर्वेक्षण सुरु आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन कोरोनासाठी  निर्माण करण्यात आलेल्या तीन स्तरावरील रुग्णालयीन व्यवस्थेत आवश्यकतेनुसार खाटांची क्षमता वाढविण्यात येत आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांसाठी त्रिस्तरीय उपचार पद्धती असून २५७६ उपचार केंद्र कार्यान्वित आहेत.

डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल (DCH) २७५ आहेत. त्यात एकूण खाटा ३३ हजार ५३८ असून अतिदक्षता विभागातील ५००३ खाटा आहेत. २०२८ व्हेंटीलेटर असून २ लाख ५६ हजार ४८५ पीपीई कीटस् आहेत. तर ४ लाख ३१ हजार २१४ एन ९५ मास्क उपलब्ध आहेत.

डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर (DCHC) ४४९ आहेत. त्यात एकूण खाटा २८ हजार ९२७ असून अतिदक्षता विभागातील २१३७ खाटा आहेत. ६१५ व्हेंटीलेटर असून ६४ हजार ३०८ पीपीई कीटस् आहेत तर २ लाख ११ हजार ८४७ एन ९५ मास्क उपलब्ध आहेत.

कोविड केअर सेंटर (CCC) १६४३ आहेत. त्यात एकूण खाटा २ लाख ६ हजार ४२८ असून १ लाख ५४ हजार ८६० पीपीई कीटस् आहेत. तर ३ लाख २५ हजार ९६१ एन ९५ मास्क उपलब्ध आहेत.

वर्गवारी न केलेले २०५ उपचार केंद्र आहेत.

२५७२ उपचार केंद्रांमध्ये २ लाख ७८ हजार ४५९ आयसोलेशन बेडस् आहेत.त्यातील अतिदक्षता विभागातील एकूण बेडस् ८५०१ आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट २९४१ झोन क्रियाशील असून आज एकूण १७ हजार ६०० सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६७.६८  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट