
अनिल गोटे यांचा फडणवीसांच्या टोळीवर हल्लाबोल
भाजपला महाराष्ट्रात कुणीही गांभीर्याने घेत नाही
- by Adarsh Maharashtra
- May 29, 2020
- 1348 views
धुळे:(लक्ष्मणराव पाटोळे) महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि पुन्हा भाजपची सत्ता ऐईल आपण मुख्यमंत्री बनू अशी मुंगेरीलालची हसीन स्वप्ने सध्या फडणवीस बघत आहेत आणि म्हणूनच दिल्लीतील भाजपा नेतृत्वाला खुश करण्यासाठी खोटी माहिती पसरवून महाराष्ट्र सरकारची आणि महाराष्ट्राची बदनामी करीत आहेत पण त्यांच्या चमच्याची कोल्हेकुईला महाराष्ट्रात कवडीचीही किंमत राहिलेली नाही जोवर शरद पवार यांच्यासारखे मुत्सद्दी आणि राजकारण धुरंधर नेते सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तोवर महाराष्ट्रातील आघाडी सरकारला कसलाही धोका नाही असे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी म्हटले आहे
भाजपच्या दगा बाजीचा जवळून अनुभव घेतलेल्या अनिल गोटे यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून भाजपने सुरू केलेल्या घाणेरड्या राजकारणाचा जाहीरपणे पंचनामा केला आहे अजित पवार जयंतराव पाटील,अशोक चव्हाण आदी आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांना मायक्रो मॅनेजमेंट करून पाडू अशी फडणवीसांनी हवा निर्माण केली पण त्या हवेत त्यांचाच पाला-पाचोळा झाला ५० वर्ष अभेद्य असलेला पवारांचा बारामतीचा गड पाडण्याची फडणवीसांची वल्गना म्हणजे अतिशयोक्तीचा कळस होता त्यासाठी सांगली वरून पडेल पडळकर याला आणले आणि तिथेही पडळकर यांच्या सोबत फडणवीस ही तोंडघशी पडले. तर वाचाळवीर चंद्रकांत दादांना कोल्हापुरात कुणी किंमत द्यायला तयार नसल्याने त्यांना कोथरूडच्या आश्रमात तोंड लपवण्याची वेळ आली महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या सभा होऊनही भाजपला सत्ते पर्यंत पोचता आले नाही मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेशी दगाबाजी करणे त्यांना भारी पडले आणि शिवसेनेने भाजपची साथ सोडण्याचा खंबीरपणा दाखवताच भाजप सत्ते पासून दूर फेकली गेली आणि म्हणूनच त्यांचा थयथय सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्र कोरीनाशी लढत असताना या लोकांनी आंदोलन केल्यामुळे महाराष्ट्रातील जनता संतापली आहे आंदोलने कधी आणि कुठल्याप्रसंगी करायची याचीही भाजपा नेत्याना अक्कल नसेल तर त्यांनी पुन्हा एकदा खाकी इजार आणि काळी टोपी घालून नागपूरला जावे आणि संघाच्या शिबिरात राजकारणाचे धडे घ्यावेत अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रातील जनता व्यक्त करीत आहे अनिल गोटे यांनी त्यांच्या पत्रकात लपून छपून रात्रीच्या अंधारात धुळ्यात येऊन एम आय एम आणि अपक्षानां हाताशी धरून घोडे बाजार करून आपल्याच माणसाचा त्यावेळी गळा कापणाऱ्या गिरीश महाजन यांच्या दगाबाजीचाही पंचनामा केलाय
अनिल गोटे यांच्या सारख्या एका मास लीडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आमदारांचे हे प्रसिध्दी पत्रक महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच खळबळजनक ठरले आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम