कर्जत तालुक्यांत दोन गटात प्रंचड तुंबळ हाणामारी! दोन्ही गटाकडुन तीक्ष्ण हत्याराचाही मुक्तहस्ते वापर!
दोन्ही गटाकडुन परस्पर विरोधी तक्रार दाखल! जखमीवंर रुग्णालयात आहेत उपचार सुरु!
- by Adarsh Maharashtra
- May 26, 2020
- 656 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील सावळा गावात काल दोन गटात क्षुल्लक कारणावरून तुंबल हाणामारी झाली आहे. या हाणामारीत दोन्ही गटांकडुन मुक्तहस्ते तीक्ष्ण हत्याराचा वापर करण्यात आला आहे. यामघे दोन्ही गटाचे अनेकजण गंभीर जखमी झाले असुन त्यांचावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रार दाखल केली असुन कर्जत पोलिसांनी दोन्ही गटांवर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत कर्जत पोलिस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार कर्जत पोलिस ठाणे हद्दीतील सावळा गावातील एका रस्त्याचे सिमेंट क्राॅक्रीटीकरणाचे काम झाले आहे. यावरून काल सकाळी रोहीदास परशुराम धुळे आणि शांताराम गोविंद धुळे यांच्यामधे बाचाबाची झाली होती. त्यानंतर काल संध्याकाळी ५.३० वीजताचा दरम्यान याच रसत्यावर पाईप टाकुन पाणी मारत असताना यावरून येथिल दोन गटात बाचाबाची होवुन या बाचाबाचीचे गंभीर हाणामारीत रुंपातर झाले आहे. या हाणामारीत दोन्ही गटाकडुन तीक्ष्ण हत्याराचा मुक्तहस्ते वापर करण्यात आला आहे. यामघे एका गटाचे मिलिंद विष्णु धुळे, नितीन धुळे, विष्णु गणपत धुळे यासंह अनेक जण गंभीर जखमी झाले असुन दुसऱ्या गटातील शांताराम गोविंद धुळे, संदेश शांताराम धुळे, काशिनाथ लक्ष्मण धुळे यांसह अनेकजण जखमी झाले आहेत.
या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात रोहीदास परशुराम धुळे यांनी तक्रार दाखल केली आहे. कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा रजि नंबर १११/२०२० नुसार भादवि कलम ३०७ वगैरे गुन्हा शांताराम गोविंद धुळे व इतर असे एकुण १२ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटातील शांताराम गोविंद धुळे यांनीही कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कर्जत पोलिस ठाण्यात या प्रकरणी नितीन विष्णु धुळे वगैरे इतर यांच्यावर गुन्हा रजि. नंबर ११२/२०२० नुसार भादवि कलम ३२६ व अन्य कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या असुन या हाणामारीत काहींचे डोक्यावर, हातावर गंभीर वार झाले आहेत. या हाणामारीत महीलाही जखमी झाल्या आहेत.
दरम्यान या प्रकरणी कर्जत पोलिस ठाणेत दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाल्याने या कर्जतच उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतचे वरिष्ट पोलिस निरीक्षक अरुण भोर, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. पाटील, गावडे साहेब, हवालदार श्री. नरुटे, हवालदार श्री. लोखंडे, श्री. सानप यासंह अन्य पोलिस कर्मचारी या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. या घटेनेतील दोन्ही गटाचे जखमी रुग्णालयात उपचार घेत आसल्साचे पोलिसांनी सांगितले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम