
राज्यभरात आतापर्यंत १४ हजार ६०० रुग्णांना घरी सोडले ! राज्यात सध्या ३३ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरू
कोरोनाचे आज ३०४१ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण ५० हजार २३१
- by Adarsh Maharashtra
- May 24, 2020
- 913 views
मुंबई, दि.२४: राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २३१ झाली आहे. आज ३०४१ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११९६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १४ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३३ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ६२ हजार ८६२ नमुन्यांपैकी ३ लाख १२ हजार ६३१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५० हजार २३१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ९९ हजार ३८७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज ५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण संख्या १६३५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३८ मृत्यू हे मागील २४ तासांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २३ एप्रिल ते २० मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३९, पुण्यात ६, सोलापूरात ६, औरंगाबाद शहरात ४,लातूरमध्ये १, मीरा भाईंदरमध्ये १, ठाणे शहरात १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३४ पुरुष तर २४ महिला आहेत. आज झालेल्या ५८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३० रुग्ण आहेत तर २७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १ जण ४० वर्षांखालील आहे. या ५८ रुग्णांपैकी ४० जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: ३०,५४२ (९८८)
ठाणे: ४२० (४)
ठाणे मनपा: २५९० (३६)
नवी मुंबई मनपा: २००७ (२९)
कल्याण डोंबिवली मनपा: ८८९ (७)
उल्हासनगर मनपा: १८९ (३)
भिवंडी निजामपूर मनपा: ८६ (३)
मीरा भाईंदर मनपा: ४६४ (५)
पालघर:११४ (३)
वसई विरार मनपा: ५६२ (१५)
रायगड: ४१२ (५)
पनवेल मनपा: ३३० (१२)
ठाणे मंडळ एकूण: ३८,५८५ (१११०)
नाशिक: ११५
नाशिक मनपा: ११० (२)
मालेगाव मनपा: ७११ (४४)
अहमदनगर: ५३ (५)
अहमदनगर मनपा: २०
धुळे: २३ (३)
धुळे मनपा: ९५ (६)
जळगाव: २९४ (३६)
जळगाव मनपा: ११७ (५)
नंदूरबार: ३२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १५७० (१०३)
पुणे: ३४० (५)
पुणे मनपा: ५०७५ (२५१)
पिंपरी चिंचवड मनपा: २६७ (७)
सोलापूर: २४ (२)
सोलापूर मनपा:५२२ (३२)
सातारा: २७९ (५)
पुणे मंडळ एकूण: ६५६२ (३०९)
कोल्हापूर:२३६ (१)
कोल्हापूर मनपा: २३
सांगली: ६९
सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)
सिंधुदुर्ग: १०
रत्नागिरी: १५५ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: ५०४ (५)
औरंगाबाद:२३
औरंगाबाद मनपा: १२३३ (४६)
जालना: ५६
हिंगोली: ११२
परभणी: १७ (१)
परभणी मनपा: ५
औरंगाबाद मंडळ एकूण: १४४६ (४७)
लातूर: ६७ (३)
लातूर मनपा: ४
उस्मानाबाद: ३१
बीड: २६
नांदेड: १५
नांदेड मनपा: ८३ (५)
लातूर मंडळ एकूण: २२६ (८)
अकोला: ३६ (२)
अकोला मनपा: ३६६ (१५)
अमरावती: १३ (२)
अमरावती मनपा: १५५ (१२)
यवतमाळ: ११५
बुलढाणा:४० (३)
वाशिम: ८
अकोला मंडळ एकूण:७३३ (३४)
नागपूर: ७
नागपूर मनपा: ४६४ (७)
वर्धा: ४ (१)
भंडारा: १०
गोंदिया: ३९
चंद्रपूर: १०
चंद्रपूर मनपा: ९
गडचिरोली: १३
नागपूर मंडळ एकूण: ५५६ (८)
इतर राज्ये: ४९ (११)
एकूण: ५० हजार २३१ (१६३५)
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम