नगरसेवक दत्ता पोंगडे आणि शाखाप्रमुख जयसिंग भोसले यांनी केली नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

मुंबई : काळाचौकी    येथील   शिवसेना नगरसेवक दत्ता पोंगडे आणि शाखाप्रमुख जयसिंग    भोसले    यांच्या        वतीने  काळाचौकी परिसरात.  ठिक    ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन    करण्यात आले होते. या.   शिबिरात     नागरिकांची थर्मोमीटरद्वारे फिवर आणि ऑक्सिजन लेव्हल  तपासणी करण्यात आली. तसेच कोरोना   पार्श्वभूमीवर      नागरिकांना.  तज्ञ   डॉक्टर   यांनी.    योग्य    प्रकारे     समुपदेशन करून मोफत औषधे देण्यात आली. या तपासणी.     शिबिरात        काळाचौकी   परिसरातील    नागरिकांना मोठ्या संख्येने   सहभाग   घेतला.     या कोरोनाच्या     वैश्विक         महामारीत    नागरिकांना    आपल्या     आरोग्याची काळजी.   आपण    स्वतः.    घ्यायची आहे.या  आरोग्य.  शिबिराच्या माध्यमातून विभागातीळ जास्तीत जास्त नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करावी आणि कोरोनाला हद्दपार करावे. नागरिकांनी वारंवार.   साबणाने     हात धुवावे. सामाजिक अंतराचे पालन करावे. घराबाहेर निघू नये. काही  आवश्यकता असल्यास मास्क घालून घराबाहेर पडावे असे आवाहन नगरसेवक दत्ता   पोंगडे आणि शाखाप्रमुख   जयसिंग    भोसले  यांनी केले आहे.   हे    शिबिर      यशस्वी करण्यासाठी    शिवसेनेचे      पदाधिकारी आणि    कार्यकर्त्यांनी  विशेष    मेहनत घेतली.

संबंधित पोस्ट