मुंबईतून धक्कादायक बातमी, शवगृहातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
- by Adarsh Maharashtra
- May 24, 2020
- 475 views
मुंबई,२४ मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. कोरोनाशी दोन हात करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांनाही कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आली आहे. आता केईएम रुग्णालयातील शवगृहातील ३ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या शवगृहातील ३ कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या विभागात एकूण २७ कर्मचारी काम करतात आणि त्यापैकी ३ जण आता रुग्णालयात दाखल झाले आहे. कोरोनाची परिस्थितीत दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे कर्मचारी कमी आणि काम जास्त अशी परिस्थिती आहे.
दरम्यान,मुंबई,उपनगरं आणि पुण्यात गेल्या २४ तासांत तब्बल २६०८ रुग्ण राज्यभरातून वाढले आहेत. तर २४ तासांत ६० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू नोंदला गेला आहे. यात ४० मुंबईत तर १५ पुण्यातले रुग्ण आहेत आतापर्यंत १५७७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ही देशातली सर्वात मोठी संख्या आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम