मुंबई-पुण्यात तब्बल ४.८५ लाख लोकं होम क्वारंटाइन

मुंबई, २३ मे:- सध्या राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. मुंबईत एकूण २७,२५१ रुग्णसंख्या झाली असून, राज्यात ६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत २७ करोना रुग्ण मरण पावले.

राज्यात आज ८५७ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३० हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्य सरकारने शनिवारी संध्याकाळी पाठवलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या ४७१९० वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात ३,४८,०२६ जणांची COVID-19 ची चाचणी करण्यात आली आहे.राज्यभरात घरी विलगीकरणात असलेले ४ लाख ८५ हजार ३२३ जण आहेत तर ३३५४५ लोकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

     आज दिवसभरात

नवे रुग्ण २६०८

मृत्यू –६० ( मुंबई ४०, पुणे १४)

एकूण मृत्यू -१५७७

एकूण – ४७१९०

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट