कंटेंनमेंट झोनच्या नियमांना फाट्यावर मारत येथील काही टाळकी फिरत आहेत मोकाट
- by Adarsh Maharashtra
- May 21, 2020
- 770 views
मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले)कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या परीसरात इतरांना कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून त्या परिसराला कंटेंनमेंट झोन म्हणून प्रशासनातर्फे घोषित करण्यात येते व अश्या झोनमधील लोकांना बाहेर पडण्यास मनाई असते. असे असूनही मुलुंड पश्चिम मधील कंटेंनमेंट झोन म्हणून जाहीर केलेल्या इंदिरा नगर, रामगढ़ परीसरातील नागरिक बाहेर पडताना दिसत असल्याने प्रशासनाला चिंतेत टाकले आहे. येथे कोणीही बाहेर जाऊ नये किंवा आत येवू नये म्हणून बॅरिकेडस लावण्यात आले आहेत तरीही बॅरिकेडस ओलांडून येथून लोकं बाहेर पडताना दिसत आहेत.
मुलुंड मधील काही स्लम वस्त्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने त्या वस्त्यांचा कंटेंनमेंट झोनमध्ये समावेश करण्यात आला परंतु येथून लोकं सतत विनाकारण आत बाहेर करत असल्याचे मुलुंड पोलिसांनी सांगितले. मुलुंड पश्चिम येथील कंटेंनमेंट झोनची संख्या वाढल्याने सतत एखाद्या ठिकाणी पोलिसांचा पहारा शक्य नसल्याने याचा फायदा घेत नागरिक, पोलिस तेथे असेपर्यंत बाहेर पडत नाहीत परंतु पोलिस जाताच त्यांची ये-जा चालू होते.
विनाकारण बाहेर फिरणाऱ्या तसेच तेथे गप्पा मारत बसणाऱ्या अशा काही लोकांमुळे कोरोनाचा फैलाव वाढू शकतो, पोलिसांनी अश्या लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी शासकीय नियमांचे योग्यरित्या पालन करत घराबाहेर न पडणाऱ्या येथील सुजाण नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे.
मुलुंड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात सांगितले की, अशा क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना २४ तास घरात बांधून ठेवणे शक्य नाही तरीही तेथील रस्ते बंद करण्यात आले आहेत व पोलिस देखील या सर्वांवर नजर ठेवून आहेत त्यामुळे तशी वेळ आली तर योग्य ती कारवाई केली जाईल
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम